• Sun. Jun 14th, 2026

    मे महिन्यात कोकणवासियांना मिळणार खास भेट! आठवड्यातून तीन दिवस दिवा-चिपळूण अनारक्षित मेमू सेवा; कसं असेल वेळापत्रक ?

    मे महिन्यात कोकणवासियांना मिळणार खास भेट! आठवड्यातून तीन दिवस दिवा-चिपळूण अनारक्षित मेमू सेवा; कसं असेल वेळापत्रक ?

    Diva-Chiplun Memu Service: कोकण रेल्वेवर विशेष मेमू सेवा सुरू होणार आहे. मे महिन्यात उन्हाळ्याच्या सुट्ट्यांनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांना या ट्रेनमुळे मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    ठाणे: कोकणवासियांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कोकण रेल्वे मार्गावरून अतिरिक्त मेमू ट्रेन या उन्हाळ्यात धावणार असून वीकेंडला धावणाऱ्या या ट्रेनमुळे कोकणवासियांना मोठा फायदा होणार आहे.

    कधीपासून सेवा सुरू?

    1 मे ते 7 जूनदरम्यान ही विशेष मेमू ट्रेन धावणार आहे. दिवा ते चिपळूण अनारक्षित मेमू ट्रेन आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे. ही मेमू लोकल आठ डब्ब्यांची असून वीकेंडदरम्यान तीन दिवस धावणार आहे. त्यामुळे महिन्याभरात दिवा ते चिपळूण 18 आणि परतीच्या मार्गावर चिपळूण ते दिवा 18 अशा एकूण 36 फेऱ्या होतील. परंतु, ही ट्रेन केवळ आठ डब्ब्यांची असून त्यात आठवड्यातून फक्त तीन दिवस धावणार असल्यामुळे प्रवाशांना कितपत फायदा होईल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

    दरवर्षी उन्हाळ्यांच्या सुट्ट्यांमध्ये वाढणारी ट्रेनची मागणी पाहून कोकण रेल्वे मार्गावर ही विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी याबद्दल अधिकृत वेळापत्रक जारी केलं गेलं आहे. या वेळापत्रकानुसार दिवा ते चिपळूण अनारक्षित मेमू सेवा आठवड्यातून शुक्रवार, शनिवार, रविवार असे तीन दिवस धावणार आहे. शाळा-कॉलेजला सुट्ट्या लागल्यानंतर सर्वांची पावले शहरापासून गावच्या दिशेने धावू लागतात. अशा वेळी कोकण रेल्वे मार्गावर आधीच गाड्यांची संख्या प्रवाशांच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे ही विशेष मेमू ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

    कसं असेल वेळापत्रक?

    ट्रेन क्रमांक 01160 चिपळूण-दिवा स्पेशल अनारतक्षित मेमू ट्रेन चिपळूण स्थानकावरून दुपारी 15.30 वाजता सुटणार आहे. त्याच दिवशी रात्री 23.10 वाजता ही ट्रेन दिवा जंक्शन रेल्वे स्थानकावर दाखल होईल. दरम्यान, दिव्यावरून गाडी क्रमांक 01159 दिवा-चिपळूण स्पेशल अनारक्षित मेमू ट्रेन रात्री 23.25 वाजता रवाना होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी ही ट्रेन 6.30 वाजता चिपळूण येथे दाखल होईल.

    Maharashtra TimesMumbai Metro तिकीट आता रॅपिडोवरही, पहिल्या प्रवासावर ऑफर, प्रवाशांना अधिक पर्याय आणि सुलभता

    कोणत्या स्थानकांवर थांबे?

    दिवा-चिपळूण विशेष मेमू ट्रेन अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, नागोठणे, कासू, पेण, जिते, आप्टा, सोमटणे, पनवेल, कळंबोली, तळोजा पांचनंद आणि निळजे या रेल्वे स्थानकांवर थांबेल.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा