मुंबईतील जांभोरी मैदान परिसरात भाजपच्या मोर्चात राडा करणाऱ्या महिलेविरोधात आता मोठी घडमाड समोर येते आहे. या महिलेविरोधात आता वकिल गुणरत्न सदावर्ते यांची कन्या झेन सदावर्ते हिने वरळी पोलिसात तक्रार केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय घडणार याकेड सर्वांचं लक्ष लागलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
वरळीतील जांभोरी मैदान परिसरात भाजपने नारी वंदन विधेयक नामंजूर झाल्याच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा काढला होता. या मोर्चाचे नेतृत्व मंत्री गिरीश महाजन करत होते. मोर्चासाठी रीतसर परवानगी घेण्यात आली होती, मात्र संध्याकाळच्या वेळी रस्त्यावर मोर्चा आल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. यामध्ये एका महिलेचा मुलगा अडकला होता. तासनतास वाहतूक ठप्प राहिल्याने ही महिला प्रचंड संतप्त झाली आणि तिने थेट मोर्चात शिरून आपला संताप व्यक्त केला.
भररस्त्यात हायव्होल्टेज ड्रामा
संबंधित महिला आपल्या मर्सिडीज कारमधून उतरली आणि तिने थेट गिरीश महाजन आणि उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना सुनावण्यास सुरुवात केली. “शट अप”, “डोन्ट टॉक टू मी”, “गेट आऊट” अशा शब्दांत तिने मोर्चेकरांना फटकारले. इतकेच नव्हे तर रागाच्या भरात तिने पाण्याची बाटलीही भिरकावल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी महाजन यांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळली आणि कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.
Sanjay Gaikwad Controversy : ‘तुझाही गोविंद पानसरे करतो!’, संजय गायकवाडांच्या कथित धमकीने खळबळ; वडेट्टीवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांना धाडलं पत्र
झेन सदावर्तेची आज एन्ट्री
या राड्यावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असतानाच, आता वकील गुणरत्न सदावर्ते यांची कन्या झेन सदावर्ते हिने या प्रकरणात उडी घेतली आहे. झेनने वरळी पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधित महिलेविरोधात लेखी तक्रार दिली आहे. “महिलेने मोर्चेकरांशी असभ्य वर्तन केले आणि अपमानजनक शब्दांचा वापर केला, त्यामुळे तिच्यावर कारवाई व्हायला हवी,” अशी मागणी झेन सदावर्तेने केली आहे.
महाजन म्हणालेले…
दरम्यान, या घटनेवर मंत्री गिरीश महाजन यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. वाहतूक कोडींमुळे त्या महिला वैतागलेल्या होत्या. मोर्च्यामुळे थोड्या फार प्रमाणात वाहतूक कोंडी आणि सामान्यांना गैरसोय होत असते. मात्र त्यावेळी एक भगिनी महिला तिथे अत्यंत वाट्टेल तशा भाषेत बोलत होत्या. त्या महिला पोलीस भगिनींसोबतही अत्यंत वाईट भाषेत बोलत होत्या. मी त्यांना समजावत होतो की, आम्ही 10-15 मिनिटांत निघून जाऊ. त्या महिलेने बाटली फेकून मारली, ज्या भाषेचा वापर केला ते चुकीचं होतं. पुढच्या वेळी यासंदर्भात आम्ही काळजी घेऊ की कुणाला अशी गैरसोय होणार नाही, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली होती.
