• Sat. Jun 6th, 2026

    Sanjay Gaikwad Controversy : ‘तुझाही गोविंद पानसरे करतो!’, संजय गायकवाडांच्या कथित धमकीने खळबळ; वडेट्टीवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांना धाडलं पत्र

    Sanjay Gaikwad Controversy : ‘तुझाही गोविंद पानसरे करतो!’, संजय गायकवाडांच्या कथित धमकीने खळबळ; वडेट्टीवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांना धाडलं पत्र

    आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रकाश आंबी यांना दिलेल्या कथित धमकीमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त करत, गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आणि आंबी यांना संरक्षण देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जितेंद्र खापरे, नागपूर : ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या प्रकाशकाला दिलेल्या कथित धमकीवरून राज्यातील राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले असून, या प्रकरणामुळे कायदा-सुव्यवस्था आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या दोन्ही मुद्द्यांवर चर्चा रंगली आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी कठोर कारवाईची मागणी केली असली, तरी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे.

    या प्रकरणात प्रकाशक प्रकाश आंबी यांना कथित जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. यामुळे केवळ एका व्यक्तीची सुरक्षा नव्हे, तर राज्यातील वैचारिक वातावरण सुरक्षित आहे का, असा व्यापक प्रश्न उपस्थित होत आहे. काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तातडीने गुन्हा दाखल करण्याची आणि संबंधितांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

    आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रकाश आंबी यांना अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत “तुझाही गोविंद पानसरे करतो” अशी धमकी दिली आहे. ही धमकी केवळ एका व्यक्तीला नसून महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेला दिलेले आव्हान आहे. आमदार गायकवाड यांनी प्रकाशक आंबी यांना आई बहिणीवरून शिव्या दिल्या. लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारीच्या पदावर असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे गुंडगिरीची भाषा वापरणे हे लोकशाहीला घातक आहे. अशा आमदारांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

    Maharashtra TimesSanjay Gaikwad Controversy : ‘तुझाही गोविंद पानसरे करतो!’, संजय गायकवाडांच्या कथित धमकीने खळबळ; वडेट्टीवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांना धाडलं पत्र

    कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या करणाऱ्या प्रवृत्तींचे समर्थन करणारी भाषा आमदार वापरत असतील, तर राज्यात कायद्याचे राज्य आहे की जंगलराज असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. पानसरे यांच्या पुस्तकाचे प्रकाशक श्री. प्रकाश आंबी हे सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुरोगामी आणि प्रगत विचार समाजात पोहोचवण्याचे कार्य करत आहेत. त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, शासनाने त्यांना तातडीने पोलीस संरक्षण पुरवावे. महाराष्ट्रात विचारवंतांच्या हत्यांचा इतिहास असताना, एका आमदाराने जाहीरपणे हत्येची धमकी देणे ही चिंतेची बाब आहे. या प्रकरणाची ऑडियो क्लिप व्हायरल होऊनही शासन गप्प का? गृहखात्याने तत्काळ गुन्हा दाखल करून कारवाईचे आदेश द्यावेत अशी मागणी वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

    मात्र, सत्ताधारी गटाकडून या आरोपांवर सावध भूमिका घेतली जात आहे. काही नेत्यांच्या मते, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असून, केवळ राजकीय फायद्यासाठी मुद्दा वाढवला जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याचा दावा करण्यात येत असला, तरी त्याची सत्यता तपासणे महत्त्वाचे असल्याचेही सांगितले जात आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा