• Sat. Jun 6th, 2026

    Maharashtra Cabinet Decision : न्यायालयाचा आदेश आणि सरकारनं फिरवली चक्र, आदर्श महाविद्यालयांतील शिक्षकांचा वनवास संपला; आगामी पदभरतीतही फायदा

    Maharashtra Cabinet Decision : न्यायालयाचा आदेश आणि सरकारनं फिरवली चक्र, आदर्श महाविद्यालयांतील शिक्षकांचा वनवास संपला; आगामी पदभरतीतही फायदा

    UGC Pay Scale For Teachers : राज्यातील ७ आदर्श महाविद्यालयांतील शिक्षकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाने या शिक्षकांना UGC स्केलनुसार वेतन आणि भत्ते लागू करण्यास मंजुरी दिली असून, आगामी पदभरतीत १० अतिरिक्त गुणांचा लाभही मिळणार आहे.

    ७ आदर्श महाविद्यालयांतील शिक्षकांना UGC नुसार मूळ वेतन व महागाई भत्ता लागू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई/पुणे : महाराष्ट्र सरकारने उच्च शिक्षण क्षेत्रात शिकवणी करणाऱ्या शिक्षकांसाठी आता मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने आता आदर्श महाविद्यालयांमधील शिक्षकांच्या मागण्या मान्य केल्या असून त्यांना आता मोठ्या सुविधा लागू करण्यात येणार आहेत. नुकतीच मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्यातल्या सात आदर्श महाविद्यालयांतल्या शिक्षकांना यूजीसी स्केलनुसार मूळ वेतन त्याशिवाया महागाई भत्ता आणि इतर भत्ते लागू करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे या निर्णयातून अनेक वर्षे प्रलंबित असलेला वेतनाचा प्रश्न अखेल सुटला आहे.

    अतिरिक्त १० गुण

    दरम्यान, राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सात महाविद्यालयांमधील प्राध्यापक आणि शिक्षकांना पदावर काम करताना आता यूजीसी स्केलने मूळ वेतन, महागाई भत्ता आणि अन्य भत्तेही मिळणार आहेत. याचा परिणाम म्हणजे आता शिक्षकांच्या आर्थिक अडचणी दूर होऊ शकतील. फक्त एवढंच नाही तर उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या भविष्यात होणाऱ्या पदभरतीमध्येही या सर्व शिक्षकांना अतिरिक्त १० गुण दिले जाणार आहेत.

    न्यायालयाकडून मान्यता

    राज्यात अनेक शिक्षक हे तासिका तत्वावर किंवा मर्यादित वेतन श्रेणीवर काम करतात. मात्र आता सहाय्यक प्राध्यापकांच्या यूजीसी स्केलने वेतनाचा मार्ग मोकळा झाला आहे. डीएच्या वाढीमुळे प्रत्यक्ष हातात येणाऱ्या वेतनात आता मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे याविषयी अनेक शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली होती, त्यांना आता न्याय मिळाला आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं हा प्रस्ताव सादर केल्यानंतर त्याला न्यायालयाकडून मान्यता देण्यात आली आहे.

    Maharashtra TimesRaigad News : घाटात बेवारस बाईक दिसली अन् संशय बळावला, 700 फूट खाली उतरताच बचाव पथकाच्या पायाखालची जमीनच सरकली

    शिक्षकांनी काय म्हटलं?

    दरम्यान, या मोठ्या निर्णयामुळे आता समान काम, समान वेतन या तत्वाला बळ मिळणार आहे. शिक्षक संघटनांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. या निर्णयामुळे शिक्षकांचा आत्मविश्वास वाढणार आहे, त्यांची शिक्षणाची गुणवत्ता सुधारणार आहे, अशा प्रतिक्रिया यावेळी शिक्षकांनी दिल्या आहेत. एकूणच काय तर या निर्णयामुळे शिक्षकांना आर्थिक दिलासा मिळाला आहे. त्यांना करिअरमध्ये अतिरिक्त संधीसाठी वाव मिळाला आहे आणि शिक्षण व्यवस्थेला बूस्ट मिळाला आहे.

    कोणती आहेत सात आदर्श महाविद्यालये?

    जालना जिल्ह्यातील घनसांवगी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्याशी संलग्र), बुलढाणा (संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती), रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन (श्रीमती नाथीबाई दामोदार ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई), हिंगोली (स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड), गडचिरोली (गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली), रत्नागिरी जिल्ह्यात आंबवडे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तळेरे येथे (मुंबई विद्यापीठ मुंबई, संलग्र) ही सात आदर्श महाविद्यालये आहेत.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा