• Sat. Jun 6th, 2026

    Mumbai Crime: मुंबईतही ऑफिसमध्ये तरुणींच्या छळाचा प्रकार उघड; 19 वर्षीय तरुणीला व्हिडिओ पाठवत केली विकृत मागणी

    Mumbai Crime: मुंबईतही ऑफिसमध्ये तरुणींच्या छळाचा प्रकार उघड; 19 वर्षीय तरुणीला व्हिडिओ पाठवत केली विकृत मागणी

    Mumbai Assault case: आरोपी तरुणाने ऑफिसधील तरुणीला फोन करत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला. यावेळी फोनवर तो अश्लील बोलत असल्याचं लक्षात येताच तरूणीने कॉल रेकॉर्ड केला.

    मुंबईतही ऑफिसमध्ये तरुणींच्या छळाचा प्रकार उघड; 19 वर्षीय तरुणीला व्हिडिओ पाठवले, धर्मावरूनही शेरेबाजी!(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: नाशिकप्रमाणे मुंबईतही कॉर्पोरेटमधील लैंगिक छळाचा प्रकार समोर आला आहे. सातरस्ता येथील आग्रीपाडा परिसरात राहणाऱ्या एका तरूणीसह तिच्यासोबत काम करणाऱ्या अन्य दोन तरूणींना शारीरिक संबंध ठेवण्यासाठी ऑफिसमधील तरूणाने ब्लॅकमेल केले. तरूणीने केलेल्या तक्रारीवरून आग्रीपाडा पोलिस ठाण्यात संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आग्रीपाडा येथे राहणाऱ्या तरूणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीनुसार, 19 वर्षीय तरूणी एका बांधकाम कंपनीच्या महालक्ष्मी येथील साईटवर कार्यालयात कामाला होती. या साईटवरील काम पूर्ण झाल्याने कार्यालय बंद करण्यात आले. तिच्यासोबत काही अन्य तरूणी या ठिकाणी वेगवेगळ्या पदावर कामाला होत्या. दोन दिवसांपूर्वी तिला अशरफ नावाच्या तरूणाचा मेसेज आला. त्यानंतर त्याने तिला फोन केला आणि शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकू लागला. तो अश्लील बोलत असल्याचे ऐकून तरूणीने त्याचा कॅाल रेकॉर्ड करून ठेवला आणि आपल्याला असे काहीच करायचे नाही असे सांगत फोन करू नकोस, असे बजावले. त्यावर त्याने धर्मावरून शेरेबाजी करत अश्लील व्हिडीओ पाठवले. सध्या तुमच्या धर्मातील तरुणींना आमच्या धर्मातील तरूण आवडत असल्याचे सांगत त्याने तिला अश्लील व्हिडिओ पाठवल्याचा आरोप आहे.

    तरूणीने याबाबत आपल्यासोबत काम करणाऱ्या अन्य दोन तरूणींना विचारले. त्यांनी देखील आपल्यासोबतही अशरफ याने असेच केल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशीही त्यांचे फोन आणि मेसेज येतच होते. “मेरे साथ लव्ह फ्रेंडशिप कर ले” असे सांगून तो ब्लॅकमेल करू लागला. यामुळे घाबरलेल्या तरुणीने हा सर्व प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. त्यांनी मुलीला सोबत घेऊन अशरफ याच्याविरोधात आग्रीपाडा पोलिस ठाण्यात तक्रार केली.

    दरम्यान, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून अशा प्रकरणातील आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई करून सदर घटनांना चाप बसवावा, अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा