बारामती विधानसभा मतदारसंघात आज पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. बारामतीत भविष्यात पवार विरुद्ध पवार लढाई होईल का, असा प्रश्न मतदानानंतर रोहित पवार यांना विचारण्यात आला. त्यावर ही शक्यता नाकारता येत नसल्याचं रोहित पवार म्हणाले.