आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर ही पोटनिवडणूक होत आहे. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होत असून भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी सकाळीच आपल्या मतदानाचा हक्क बजावला. महाविकास आघाडीचे गोविंद मोकाटे विरुद्ध महायुतीचे अक्षय कर्डिले असे सरळ लढत होत आङे. स्व.शिवाजीराव कर्डिले यांनी केलेले कामे आणि जनतेचा त्यांच्यावर असलेला विश्वास ज्यास माध्यमातून आपल्याला जनता निवडून देईल असा विश्वास अक्षय कर्डिले यांनी मतदानानंतर व्यक्त केला आहे.