• Sun. Jul 5th, 2026

    मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष) केंद्र सरकारच्या ‘आयगॉट–साधना सप्ताह २०२६’ मध्ये महाराष्ट्र अव्वल – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 22, 2026
    मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष) केंद्र सरकारच्या ‘आयगॉट–साधना सप्ताह २०२६’ मध्ये महाराष्ट्र अव्वल – महासंवाद

    मुंबई, दि. २२ : केंद्र सरकारच्या ‘मिशन कर्मयोगी’ अंतर्गत आयोजित ‘साधना सप्ताह २०२६’ मध्ये राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावत नवा मानदंड प्रस्थापित केला आहे. या अध्ययन सप्ताहात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील या उपक्रमात सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्ञानोपासना, क्षमताविकास आणि उत्तम सार्वजनिक सेवा देण्याच्या दृष्टीने ‘मिशन कर्मयोगी’ हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी तसेच सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि पाठबळ दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

    महाराष्ट्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ‘आयगॉट कर्मयोगी’ प्लॅटफॉर्मवर एकूण ४६ लाख ९४ हजार ५९७ अभ्यासक्रम पूर्ण करत ६ लाख ५९ हजार ७५९ एआय-विशिष्ट प्रमाणपत्रे प्राप्त केली आहेत. हे आधुनिक सुशासन आणि क्षमताविकासाबाबत राज्याच्या दृढ वचनबद्धतेचे द्योतक असल्याचे मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे.

    देशभरातील सुमारे ३३ लाख ४ हजार शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ‘साधना सप्ताह’ात सहभाग घेत ‘iGOT कर्मयोगी’ प्लॅटफॉर्मवर सुमारे चार तासांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. यामध्ये राज्यातील ५ लाखांहून अधिक अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते. या उपक्रमात महाराष्ट्राने केलेली कामगिरी ही राज्याच्या प्रशासनिक कार्यक्षमतेचा उत्कृष्ट नमुना असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नमूद केले.

    ०००००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed