• Sun. Jul 5th, 2026

    Pune News: मावळात रस्ता फुटला? व्हायरल व्हिडिओबाबतचे सत्य अखेर समोर; विकासकामांचा भांडाफोड, टेस्टिंगमध्येच उघड झाला घोळ!

    Pune News: मावळात रस्ता फुटला? व्हायरल व्हिडिओबाबतचे सत्य अखेर समोर; विकासकामांचा भांडाफोड, टेस्टिंगमध्येच उघड झाला घोळ!

    Talegaon Dabhade: पाण्याच्या वेगवान फवाऱ्याने शहरातील विकासकामांचा दर्जा, कंत्राटदारांकडून झालेला निष्काळजीपणा व कामांच्या सुमार गुणवत्तेची पोलखोल झाली आहे.

    मावळात रस्ता फुटला? व्हायरल व्हिडिओबाबतचे सत्य अखेर समोर; विकासकामांचा भांडाफोड(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी- चिंचवड : गेल्या आठवडाभरापासून पुणे शहरासह जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मावळ तालुक्यालाही पावसाने झोडपून काढलं असून तालुक्यातील नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. अशातच तळेगाव दाभाडे येथील एका रस्त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाण्याचा मोठा फवारा येऊन रस्ता फुटत असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. मात्र हे पाणी पावसाचे नसून एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. तळेगाव दाभाडे शहरात विकासकामांच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक बाब उघड झाली आहे. उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या नव्या पाणीपुरवठा योजनेची चाचणी सुरू असतानाच रस्त्याच्या मधोमध अचानक पाण्याचा प्रचंड फवारा उसळला. काही क्षणांसाठी नागरिकांना रस्ताच फुटला की काय, असा भास झाला आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

    धक्कादायक बाब म्हणजे, ही घटना कोणत्याही नैसर्गिक कारणामुळे नव्हे तर कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालं. पाईपलाईन जोडणी करताना दोन पाइप एकमेकांना व्यवस्थित जोडलेच गेले नव्हते. त्यामुळे चाचणीदरम्यान पाण्याचा दाब वाढताच जोडणी सुटली आणि रस्त्याच्या मधून पाण्याचा फवारा उसळला.

    विशेष म्हणजे, दीड वर्षांपूर्वी पाणीपुरवठा योजनेसाठी रस्त्याखालून नवीन पाईपलाईन टाकण्यात आली होती. त्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आणि पुढील आठवड्यात या योजनेचे उद्घाटन करण्याची तयारी सुरू होती. मात्र उद्घाटनापूर्वी नगरपरिषदेकडून शनिवारी नव्या टाकीतून पाणी सोडून चाचणी घेतली असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

    या प्रकरणाची गंभीर दखल घेत तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दपकेकर यांनी संबंधित कंत्राटदाराकडूनच पाईपलाईन दुरुस्ती आणि रस्त्याच्या पुनर्बांधणीचा संपूर्ण खर्च वसूल करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एका पाण्याच्या फवाऱ्याने तळेगावमधील विकासकामांचा दर्जा, कंत्राटदारांची निष्काळजीपणा आणि कामांच्या गुणवत्ता नियंत्रणाची यंत्रणा यांचीच पोलखोल केली आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा