• Thu. Sep 3rd, 2026
Ratnagiri Heavy Rain | मुसळधार पावसाचा फटका,दापोली तालुक्यातील अनेक गावे जलमय

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

कोकणात पावसाने हाहाकार उडवला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी सखल भागात पाणी भरल आहे. दापोली तालुक्यातील जालगाव विद्यानगर ,साईनगर परिसरात अनेक घरांना पाण्याने वेढा घातला आहे.काही नागरिकांना जालगाव सरपंचांनी व ग्रामपंचायत आपत्कालीन विभागाने स्वतः पाण्यात उतरून सुरक्षित स्थळी हलवल आहे. विद्यानगर परिसरातील जवळपास 40 घरांना पाण्याचा वेढा आहे या सगळ्या बाबत संतप्त प्रतिक्रिया येथील नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. या सगळ्या परिस्थितीवर दापोलीच्या तहसीलदार अर्चना बोंबे यांचे जालगाव ग्रामपंचायत प्रशासन प्रशासन लक्ष ठेवून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed