• Fri. Sep 18th, 2026

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील घातक रासायनिक द्रव्याची गैरप्रकारे विल्हेवाट -उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे प्रत्यक्ष पाहणीचे निर्देश – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Apr 21, 2026
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील घातक रासायनिक द्रव्याची गैरप्रकारे विल्हेवाट -उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे प्रत्यक्ष पाहणीचे निर्देश – महासंवाद

मुंबई दि.२१ : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील घातक रासायनिक द्रव स्वरुपातील गैरप्रकारबद्दल औद्योगिक भूखंडाची प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.

विधानभवनामध्ये तारापूर औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्र८ डी./१ येथे सडेकर इनव्हायरो इंजिनीअर्स प्रा. नी अवैधरित्या व बेकायदेशीरपणे घातक रासायनिक द्रव्याची गैरप्रकार विल्हेवाट लावल्याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते.

औद्योगिक भूखंडाचा करार एमआयडीसीने २०१५ व २०२० मध्येच रद्द केला असतानाही कंपनीकडून बेकायदेशीरपणे काम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, उच्च रासायनिक घटक असलेले सांडपाणी थेट नाल्यात व समुद्रात सोडले जात असल्याची तक्रार समोर आल्याने या प्रकरणात सविस्तर माहिती घेण्याकरिता प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यावेळी संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

0000

राजू धोत्रे/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed