नाशिकमधील नामांकित आयटी कंपनीत ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. पीडित तरुणीने केलेल्या तक्रारीनंतर आयोगाच्या समितीन 2 दिवसांपासून नाशिकमध्ये तळ ठोकला आहे. कंपनीच्या कॅम्पसमध्ये जाऊन या प्रकरणाची सखोल चौकशी महिला आयोगाच्या पथकाकडून करण्यात आली आहे. या चौकशीत अनेक खळबळजनक बाबी या आता उघड झाल्या आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जयेश साबळे, नाशिक : नाशिकच्या एका बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील महिला अत्यातार आणि धर्मांतरणाचे प्रकरण किती गंभीर आहे ते आता हळूहळू समोर येऊ लागले आहे. या प्रकरणाची व्याप्ती आता वाढताना दिसत आहे. या प्रकरणाची दखल केंद्रीय महिला आयोगाने घेतली आहे. केंद्रीय महिला आयोगाचं पथक नाशिकमध्ये संबंधित कंपनीत तळ ठोकून आहे. महिला आयोगाकडून पीडितांची विचारपूस केली जात आहे. आरोपींकडून आणखी कुणाला त्रास देण्यात आला का? याचा तपास आता महिला आयोगाकडून केला जात आहे. विशेष म्हणजे महिला आयोगाच्या या तपासात धक्कादायक माहिती समोर येत आहे. एका पीडितेने महिला आयोगाच्या शिष्टमंडळाकडे आपल्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार कथन केला आहे. आरोपींच्या दबावात तिला किती मानसिक आणि शारिरीक त्रासाला सामोरं जावं लागलं याचं कथन पीडितेने केलं आहे. पीडितेने सांगितलेला प्रकार हा खरं डोकं चक्रावणारा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीचे वडील कर्करोग सारख्या आजाराने ग्रस्त आहेत. त्यांच्या केमोथेरपीसाठी तिला पैशांची नितांत गरज होती. तिच्या याच हतबलतेचा फायदा कंपनीतील काही वरिष्ठ सहकाऱ्यांनी घेतला. मदतीच्या बहाण्याने तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आला. तसेच तिचे लैंगिक शोषण आणि मानसिक छळ करण्यात आल्याचा आरोप देखील तिने केलेल्या तक्रारीत केला आहे. कामाच्या ठिकाणी धार्मिक अजेंडा राबवून एका सुशिक्षित तरुणीला जाळ्यात ओढण्याचा हा प्रयत्न आयोगाच्या प्राथमिक चौकशीत समोर आलाय.
निवृत्त न्यायमूर्ती साधना जाधव, माजी पोलीस महासंचालक बी.के. सिन्हा आणि वकील मोनिका अरोरा यांच्या उच्चस्तरीय समितीने कंपनीत जाऊन वरिष्ठ व्यवस्थापनाची चौकशी केली आहे. त्यातच या प्रकरणातील फरार असलेली संशयित निदा खान हिच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी पार पडली. मात्र न्यायालयाने निर्णय रोखून ठेवत पुढील 27 एप्रिल रोजी याबाबत सुनावणी ठेवली आहे. तर प्रकरणातील अन्य आरोपी रझा मेमन आणि शफी शेख यांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेमुळे कॉर्पोरेट क्षेत्रातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
निदा खानवर अटकेची टांगती तलवार कायम
या प्रकरणातील संशयित निदा खान हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज नाशिकरोड सत्र न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. मात्र, न्यायालयाने तिला कोणताही अंतरिम दिलासा दिल नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी 27 एप्रिल रोजी निश्चित करण्यात आली आहे. यामुळे निदा खानवर अटकेची टांगती तलवार अद्याप कायम आहे.
निदा खान ही 25 मार्चपासून फरार असून ,नाशिक पोलीस तिचा कसून शोध घेत आहेत. पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी निदा खानच्या वतीने नाशिकरोड न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता.आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. जोशी यांच्या न्यायालयात या अर्जावर ‘इन कॅमेरा’ सुनावणी पार पडली. जवळपास एक तास चाललेल्या या सुनावणीत दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला. सरकारी पक्षाने निदा खान हिचा गुन्ह्यातील सहभाग आणि तिचा शोध घेण्यासाठी पोलीस कोठडीची गरज असल्याचे मुद्दे मांडले. दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी आपला निर्णय दोन तास राखून ठेवला होता.
अखेर न्यायालयाने निदा खानला कोणताही अंतरिम दिलासा न देता पुढील सुनावणी 27 एप्रिल रोजी ठेवली आहे. फिर्यादीच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, “न्यायालयाने तिला कोणतेही संरक्षण दिलेले नाही, त्यामुळे पोलीस तिला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात.”
नाशिक पोलिसांनी यापूर्वीच या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाची चक्रे वेगवान केली आहेत. आता 27 एप्रिलच्या सुनावणीत न्यायालय काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तोपर्यंत निदा खान पोलिसांच्या जाळ्यात अडकणार की 27 तारखेपर्यंत फरार राहणार? हे बघणे महत्त्वाचे असणार आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा