Pune News: बस बंद करण्यामागे उत्पन्न व प्रवासी कमी यासह इतर कारणे दिली जात असल्याचे दिसते.
पुण्यात वाहतूक कोंडी असलेल्या मार्गांवर ‘पीएमपी’ बसच बंद? धक्कादायक माहिती उघड(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
श्रीकृष्ण कोल्हे, पुणे : ‘पीएमपी’ बंद करण्याच्या निकषांमध्ये वाहतूक कोंडी असलेला रस्ता आणि कमी उत्पन्न असलेले मार्ग अग्रक्रमाने घेतले गेले आहेत. एका ‘आरटीआय’च्या निमित्ताने ही माहिती समोर आली आहे. यामुळे ‘पीएमपी’च्या धोरणांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रत्यक्षात कोंडी कमी करण्यासाठी अशा मार्गांवर अधिक बस धावणे गरजेचे असताना, उलट सेवा बंद केली जात आहे. यामुळे नागरिक खासगी वाहनांकडे वळून रस्त्यावरची गर्दी वाढू शकते.
मार्ग बंद केल्यामुळे खासगी वाहने रस्त्यावर येतात. त्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्ते तुषार रत्नपाल यांनी ‘पीएमपी’कडे माहिती अधिकारात निकष मागितले होते. त्यातून ही माहिती समोर आली.
असे आहेत निकष
बस मार्ग सुरू किंवा बंद करताना प्रवासी मागणी, ‘पिक अवर्स’मधील गर्दी, लोकसंख्या, नव्या वसाहती, आयटी पार्क, औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्र, पर्यायी वाहतूक उपलब्धता, रस्त्यांची स्थिती आणि आर्थिक व्यवहार्यता अशा निकषांचा विचार केला जातो.
मात्र, ‘सतत ट्रॅफिक जाम’ हाही मार्ग बंद करण्याचा निकष असल्याचे म्हटले आहे. कमी प्रवासी संख्या, तोटा, त्याच मार्गावर अन्य बस किंवा मेट्रो सेवा उपलब्ध असणे, सुरक्षा कारणे, प्रवाशांकडून वारंवार तक्रारी अशा कारणांनीही मार्ग बंद करण्याचे निर्णय घेतले जातात, असे ‘पीएमपी’ने दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
लोकप्रतिनिधींना प्रतिसाद
सत्ताधारी पक्षाचा अथवा राजकीय वजन असलेल्या लोकप्रतिनिधींचा फोन आल्यावर ‘पीएमपी’कडून संबंधित भागात ‘पीएमपी’ची सेवा सुरू केली जाते. मात्र, सध्या ‘पीएमपी’कडे बसची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे नवीन बस सुरू करताना कोणत्या तरी मार्गावरील बस कमी करावी लागते. त्यामुळे त्या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना फटका बसतो.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा