Weather Forecast: २२ तारखेला वादळी पावसाच्या क्षेत्रात आणि तीव्रतेत घट होईल, असा अंदाज या वेळी वर्तवण्यात आला आहे.
मेघगर्जनेसह पावसाची शक्यता(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: राज्यातील पश्चिम महाराष्ट्र (प्रामुख्याने घाट परिसर), खान्देश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये २० ते २२ एप्रिलदरम्यान दुपारनंतर काही प्रमाणात आभाळी हवामान आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीत विजांचा कडकडाट, पाऊस; तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्याच्या हवामान अंदाजानुसार, १९ एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर; तसेच उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यातील काही भागांमध्ये दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर २० आणि २१ एप्रिल रोजी पावसाच्या क्षेत्रात वाढ होण्याचे संकेत आहेत. ज्यामुळे पश्चिम महाराष्ट्रासह (पुणे विभाग) मराठवाडा (प्रामुख्याने दक्षिण भाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग) आणि विदर्भातदेखील (प्रामुख्याने अमरावती विभाग) काही प्रमाणात वादळी पाऊस पडेल.
विदर्भात उष्णतेची तीव्रता कायम
विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्रता कायम असून वर्धा येथे तापमानाने तब्बल ४५ अंश सेल्सियसचा टप्पा गाठला आहे. यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच शनिवारी प्रथमच तापमान ४५ अंशांवर पोहोचले. इतर जिल्ह्यांमध्येही तापमान चाळिशीच्या वरच राहिल्याने नागरिक हैराण झाले आहेत. नागपुरातील ‘यल्लो ॲलर्ट’च्या पार्श्वभूमीवर शनिवारी कमाल तापमान ४४.२ अंश नोंदवले गेले, तर अकोला ४३.३, अमरावती ४४.०, चंद्रपूर ४३.४, गोंदिया ४३.२ आणि यवतमाळ ४३.८ अंशांवर पोहोचले. भंडारा आणि गडचिरोलीतही उकाड्याचा जोर कायम आहे. किमान तापमानातही वाढ झाल्याने रात्री उकाड्याची झळ कमी होत नाही. नागपूरमध्ये किमान तापमान २७.४ अंश, तर वर्ध्यात २७.८ अंश नोंदवले गेले. त्यामुळे उष्णतेचा तडाखा दिवसभर जाणवत असून नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.
दरम्यान, राज्यातील इतर भागांसह विदर्भातील काही भागांत मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता असून यात पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. नागपूर तसेच पूर्व विदर्भात तूर्त पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली नाही. मात्र, विदर्भातील पावसाळी स्थितीमुळे तापमानात काही प्रमाणात घसरण होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळू शकतो.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा