• Sun. Jun 14th, 2026
    Pune Crime : नवऱ्याशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, बायकोनं विवाहितेला निर्घृणपणे संपवलं; पतीने CCTV चेक करताच मोठं दृश्य समोर

    Pune Chandannagar Advocate Office Woman Killed : पुण्यातील चंदननगरमध्ये मोठी घटना समोर आली आहे. एका महिलेला अनैतिक संबंधातून संपवलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरलं आहे.

    पती अनैतिक संबंध संशय प्रेयसी खून(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : पुण्यातील चंदननगर परिसरात काल अनैतिक संबंधाच्या संशयावरील हत्या प्रकरणाने सर्व परिसरात खळबळ उडाली आहे. या धक्कादायक प्रकारानंतर मृत महिलेच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घडलेल्या घटनेदिवशी पतीची अवस्था काय होती हे ऐकून नागरिकांनाही गहिवरून येत आहे. घडलेल्या क्रूर हत्येनंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

    नेमकी घटना काय?

    मिळालेल्या माहितीनुसार, पूनम दिनेश मून (वय ३९, रा. गणेशनगर, येरवडा) यांचे अॅड. संजय सावंत याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय सावंत याची पत्नी स्वाती सावंत हिला होता. या संशयातूनच स्वाती सावंत, तिची मुलगी आणि स्वतः अॅड. संजय सावंत यांनी संगनमत करून पूनम मून यांची हत्या करण्याचा कट रचला. दिनांक १६ एप्रिल गुरुवारी रोजी दुपारी २ वाजल्यापासून ते काल शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंतच्या कालावधीत चंदननगरमधील जुना मुंढवा रोडवरील अॅड. सावंत यांच्या ऑफिसमध्ये ही घटना घडली. आरोपींनी आधी पूनम मून यांचे पाय दोरीने बांधले. त्यानंतर त्यांच्यावर निर्दयपणे हल्ला करत बॅटने तसेच धारदार शस्त्राने डोक्यावर आणि तोंडावर वार केले. या मारहाणीत त्या गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
    Maharashtra TimesNagpur Accident : जेवण करुन परतताना काळाची झडप, भीषण अपघातात दोघांचा जागीच अंत; रात्रभर पार्थिव रस्त्यावरच पडलेले
    या प्रकरणात विशेष बाब म्हणजे, मृत महिलेच्या पतीने दिनेश मून यांनी आपल्या पत्नीची केलेली अखंड शोधाशोध आणि त्यातून समोर आलेलं भीषण वास्तव. दिनेश मून म्हणाले की, ‘त्या दिवशी नेहमीप्रमाणे दुपारी बायको घरातून ऑफिसला गेली होती. सगळं अगदी नॉर्मल होतं, ती रोजसारखीच निघाली होती. मला एकदा ती म्हणाली की दुसरीकडे काम बघू का? पण मी कामात असल्यामुळे जास्त लक्ष दिलं नाही. पण दुपारनंतर अचानक तिचा फोन बंद झाला आणि संपर्क तुटला’, असं दिनेश मून यांनी सांगितलं. सुरुवातीला त्यांना वाटलं की मोबाईल चार्ज नसावा किंवा कामात असेल. पण जसजसा वेळ पुढे गेला, तसतशी त्यांची चिंता वाढत गेली. मनात कुठेतरी एक अस्वस्थता निर्माण झाली होती, पण नेमकं काय झालंय याचा अंदाज लागत नव्हता. वकील सावंतचं त्याच्या बायकोसोबत अनैतिक संबंधाच्या संशयावरुन वाद होत होते. त्यामुळे दुसरीकडे मुलाखतीला गेली असेल म्हणून मोबाईल बंद असेल असंही त्यांना एकवेळी वाटल्याचं त्यांनी सांगितलं.

    गोंधळात टाकणारी उत्तरं मिळाली

    दुपारी ऑफिसमधूनच फोन आला आणि सांगण्यात आलं की ‘तुमची बायको आज ऑफिसला आलीच नाही’, हे ऐकून दिनेश मून यांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण पत्नी तर घरातून निघालेली होती. त्यांनी पुन्हा पुन्हा फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण मोबाईल सतत बंद येत होता. त्याक्षणी त्यांना पहिल्यांदा खूप मोठा संशय वाटायला लागला. ते कामावरून घरी परतल्यावर तातडीने ऑफिस परिसरात पोहोचले. तिथे जाऊन चौकशी केली, पण त्यांना वेगवेगळी आणि गोंधळात टाकणारी उत्तरं मिळाली. कुणी सांगत होतं की ती आल्या होत्या, तर कुणी म्हणत होतं की आम्ही पाहिलंच नाही. या विरोधाभासी माहितीमुळे त्यांचा संभ्रम वाढत गेला.
    Maharashtra TimesPandharpur Crime : ‘तू वारंवार किरकिर करते’; संतापलेल्या नातीकडून आजीला बेदम मारहाण; विठ्ठलाच्या पंढरीत विठुरायाच्या भक्ताला संपवलं
    दिनेश मून यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहण्याचा निर्णय घेतला. त्या फुटेजमध्ये त्यांच्या पत्नी ऑफिसमध्ये प्रवेश करताना स्पष्ट दिसत होती, पण त्यानंतर त्या बाहेर आलेल्या कुठेच दिसत नव्हत्या. हा क्षण दिनेश मून यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा धक्का ठरला. दरम्यान, त्यांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरुवातीला तपासात थोडा विलंब झाला. पण त्यांना काहीतरी गंभीर घडलंय याची खात्री होती. त्यामुळे ते स्वतःच शोध घेत पुढे गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी ते थेट ऑफिसपर्यंत पोहोचले. ते वारंवार आरोपी वकील संजय सावंतला विचारपूस करत होते परंतु त्यांच्याकडूनही उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत होती.

    कोपऱ्यात ठेवलेल्या गोण्या दिसल्या

    दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला गेल्यावर ऑफिसचं दार उघडलं गेलं आणि ते आत गेले. आत पाऊल टाकताच वातावरण पूर्णपणे बदलल्यासारखं वाटलं. अंधारलेली खोली, चालू असलेला फॅन आणि अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तू, हे सगळं पाहूनच काहीतरी चुकीचं घडलंय याची जाणीव झाली. ‘मी पुढे गेलो तर फरशीवर लालसर डाग दिसले. भिंतीवरही तसेच डाग होते’, असं त्यांनी सांगितलं. थोडं पुढे गेल्यावर कोपऱ्यात ठेवलेल्या गोण्या दिसल्या. काहीतरी भयंकर घडलंय याची खात्री त्यांना झाली. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी पोलिसांना कॉल केला. चंदननगर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तपास सुरू करण्यात आला आणि गोण्या उघडताच आतून त्यांच्या पत्नीचं पार्थिव आढळून आलं.
    Maharashtra TimesDharashiv Crime : युवकाला मध्यरात्री संपवलं, २०० मीटर फरपटत नेलं, कृष्णाथ यांच्या हत्येचं गूढ उलगडलं; बायकोनं कुणाच्या सहाय्याने काटा काढला?
    पुढील तपासात समोर आलं की वकिल संजय सावंत, त्याची पत्नी स्वाती सावंत आणि अल्पवयीन मुलगी यांनी मिळून हा गुन्हा केल्याचा संशय आहे. पोलिसांनी अवघ्या काही तासांत तिघांना अटक केली आहे. प्राथमिक तपासानुसार, अनैतिक संबंधांच्या संशयातून हा प्रकार घडल्याचं समोर आलं. आज आरोपींना न्यायालयामध्ये नेण्यात आलं. पुढील अधिकचा तपास पोलीस करत आहेत.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा