• Mon. Jun 15th, 2026
    ठाकरे विधान परिषदेवर जात नसतील, तर काँग्रेसला उमेदवारी द्या, सपकाळांची मागणी, मविआत रस्सीखेच

    Maharashtra Politics : मविआतील तीनही पक्षांनी समन्वय साधत अधिकची दहा मते खेचून आणल्यास त्यांचे दोन जण विधान परिषदेवर जाऊ शकतात, मात्र यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी १२ मे रोजी निवडणूक होणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून गुरुवारी जाहीर करण्यात आले. विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी विधानसभेचे आमदार मतदान करणार आहेत.
    विधान परिषदेसाठी सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होईल, तर त्याच दिवशी निकाल जाहीर होतील. दरम्यान संख्याबळानुसार सत्ताधारी महायुतीच्या पारड्यात ८ जागा जाणार असून महाविकास आघाडीला एक जागा मिळणार आहे. ही एक जागा कोणाला जाते, याविषयी उत्सुकता आहे.

    ठाकरेंच्या नावामुळे काँग्रेसची अडचण

    सध्याच्या विधान परिषदेच्या ९ सदस्यांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपणार आहे. निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय पक्षातील इच्छुकांच्या हालचाली आपोआपच वाढल्या आहेत. मागच्या वेळी राज्यसभेसाठी उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष हा प्रमुख दावेदार होता. पण तरीही त्यांनी ही जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रामुख्याने शरद पवार यांच्यासाठी सोडली. काँग्रेसनेही पवारांना पाठिंबा दिला. आता विधान परिषदेवर उद्धव ठाकरे यांना पाठविण्याची मागणी शिवसेना उबाठा पक्षाकडून करण्यात येत आहे. साहजिकच काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. तीनही पक्षांनी समन्वय साधत अधिकची दहा मते खेचून आणल्यास महाविकास आघाडीचे दोन जण विधान परिषदेवर जाऊ शकतात. मात्र यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
    Maharashtra TimesTwo brothers One wife : दोन सख्ख्या भावांशी लग्न करणारी महिला आई झाली, चिमुकली पावलं घरी येताच परदेशी राहणाऱ्या पित्याची प्रतिक्रिया समोर

    २८ मतांचा कोटा

    विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी २८ मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीत भाजप (१३१ आमदार), एकनाथ शिंदे यांची शिवसेना (५७ आमदार) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी (४० आमदार) असे बलाबल पाहता महायुतीचे ८ उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ ४६ आहे. त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. काँग्रेसने पाठिंबा नाही दिला तरी उद्धव ठाकरे हे सहज विधान परिषदेवर निवडून जाऊ शकतात.

    MLC Election 2026 : विधानपरिषदेच्या एका जागेसाठी चढाओढ, महायुती महाविकास आघाडीची धाकधूक वाढणार?

    ‘मुख्यमंत्र्यांनी बारामतीप्रमाणे संस्कृती जपावी’

    ‘राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार असावा व विधान परिषदेला मविआचा चेहरा उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी करावी अशी काँग्रेस पक्षाची भूमिका होती. पण ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मविआकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. आता विधान परिषदेला जर उद्धव ठाकरे उमेदवार नसतील तर काँग्रेस पक्षाला उमेदवारी द्यावी, अशी आमची भूमिका आहे. विधान परिषदेची एक जागा ही काँग्रेसचे नेते राजीव सातव यांची होती. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. पण त्यांनी राजीनामा दिला. त्या जागेवर काँग्रेसच्या उमेदवाराला बिनविरोध निवडून दिले पाहिजे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी बारामतीप्रमाणे संस्कृती व परंपरेचे पालन करावे’, असे आवाहन सपकाळ यांनी केले आहे. विधान परिषदेच्या रिक्त जागेची निवडणूकही त्याच दिवशी, म्हणजे 12 मे रोजी होणार आहे.
    Maharashtra TimesVinod Tawde : बिहारमध्ये भाजपचा पहिला मुख्यमंत्री, विनोद तावडेंची पडद्यामागून शिष्टाई, गुप्तपणे सत्तेचे दरवाजे उघडले

    विधान परिषदेतील या ९ आमदारांचा कार्यकाळ संपणार

    उद्धव ठाकरे (शिवसेना – उबाठा), नीलम गोऱ्हे (शिवसेना), शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी – शरद पवार गट), अमोल मिटकरी (राष्ट्रवादी – अजित पवार गट), दादाराव कैंचे (भाजप) , रणजितसिंह मोहिते-पाटील (भाजप), संजय केणेकर, (भाजप), संदिप जोशी (भाजप) आणि राजेश राठोड (काँग्रेस)

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा