• Sat. Jun 6th, 2026

    Nashik Accident: शाळेत जाताना चेतनला बाईकने लिफ्ट दिली, पण रस्त्यात भयंकर घटना; बसच्या धडकेत शाळकरी मुलाचा मृत्यू

    Nashik Accident: शाळेत जाताना चेतनला बाईकने लिफ्ट दिली, पण रस्त्यात भयंकर घटना; बसच्या धडकेत शाळकरी मुलाचा मृत्यू

    Accident News: अपघातात चेतन गांगुर्डे हा बसच्या चाकाखाली आल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. तसंच दुचाकीस्वारही गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

    शाळेत जाताना दुचाकीस्वाराने लिफ्ट दिली, पण रस्त्यात भयंकर घटना(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जयेश साबळे, नाशिक : नाशिकमध्ये दुचाकी आणि खासगी बस यांच्या धडकेमुळे भीषण अपघात झाला आहे. एका खासगी बसच्या धडकेमुळे झालेल्या या अपघातात शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. चेतन युवराज गांगुर्डे (१५) असं या अपघातात मृत पावलेल्या शाळकरी मुलाचे नाव असून या घटनेने शहर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, चेतन गांगुर्डे हा प्रबुद्ध नगर येथे राहत होता. सातपूर कॉलनी येथील मनपाच्या माध्यमिक विद्यालयात तो ९ वी इयत्तेत शिक्षण घेत होता. कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असल्याने चेतन हा दररोज पायी शाळेत जात होता. नेहमी प्रमाणे १५ एप्रिल बुधवारी सकाळी चेतन हा शाळेसाठी निघाला होता. रस्त्यात त्याला एका दुचाकीस्वाराने लिफ्ट दिली आणि तो या दुचाकीस्वारासोबत बसून शाळेकडे निघाला. मात्र शाळेकडे जात असताना एका खासगी बसने सदर दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात चेतन हा बसच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरीकडे, अपघातात दुचाकीस्वार देखील गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

    दरम्यान, चेतन याचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण प्रबुद्ध नगर व त्याच्या शाळेत हळहळ व्यक्त केली जात आहे. चेतन याच्या पश्चात अंध वडील, आई, धाकटा भाऊ व वृद्ध आजी असा परिवार आहे. शाळेनंतर मिळालेल्या वेळात चेतन हा आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मिळेल ते काम करत असे. अशा मेहनती तरुणाच्या अपघाती मृत्यूमुळे गांगुर्डे परिवारावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा