• Sat. Jun 6th, 2026
    MLC Election Date: महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी निवडणुकीची घोषणा; 12 मे रोजी मतदान, इच्छुकांची धाकधूक वाढली

    Vidhan Parishad Election Date: महाराष्ट्रातील रिक्त होत असलेल्या विधानपरिषदेच्या जागांसाठी अखेर निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून सर्वपक्षीय इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.

    Vidhan parishad election(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त होणाऱ्या 9 जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. विधानपरिषदेच्या या 9 जागांसाठी 23 एप्रिलपासून अर्ज दाखल करता येणार असून 12 मे रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशीच सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे. उद्धव ठाकरे, शशिकांत शिंदे यांच्यासह 9 आमदारांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपुष्टात येणार असल्याने रिक्त होणाऱ्या जागांसाठी ही निवडणूक होत आहे.

    केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, 23 एप्रिल 2026 पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून 30 एप्रिल 2026 ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे. 2 मे 2026 रोजी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे, तर 4 मे 2026 हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी 12 मे 2026 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होणार असून त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल.

    दरम्यान, विधानसभेत असणाऱ्या संख्याबळानुसार विधानपरिषद निवडणुकीत 9 जागांपैकी 5 जागा भाजपच्या वाट्याला, 2 जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला, 1 जागा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीला आणि महाविकास आघाडीतील तीन पक्षांत मिळून एक जागा मिळण्याची शक्यता आहे.

    कोणकोणत्या आमदारांचा कार्यकाळ संपुष्टात?

    1. उद्धव ठाकरे
    2. नीलम गोऱ्हे
    3. शशिकांत शिंदे
    4. अमोल मिटकरी
    5. गोपीचंद पडळकर
    6. रणजितसिंह मोहिते-पाटील
    7. राजेश राठोड
    8. प्रवीण दटके
    9. रमेश कराड

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा