• Sat. Jun 6th, 2026
    Pune Crime : आधी गोळी झाडली, लागली नाही म्हणून जे मिळेल त्यानं मारलं; पुण्यात मध्यरात्री तरुणाला निर्घृणपणे संपवलं

    Pune Vishrantwadi Youth Killed : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच पुण्यात पुन्हा एकदा हत्येची घटना समोर आली आहे. जुन्या वादातून या तरुणाला संपवलं आहे.

    विश्रांतवाडी तरुणाची मध्यरात्री हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात काल मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक भीषण हत्येची घटना घडली. पूर्वीच्या वादातून १८ वर्षीय तरुणाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना विश्रांतवाडीतील कॉमर्स झोन परिसरात रात्री साडेअकरा ते साडेबारा वाजण्याच्या दरम्यान घडली. मृत तरुणाचं नाव गौरव गणेश तेलंगी (वय १८, रा. सिंहगड रोड, नवले हॉस्पिटलजवळ) असं आहे.

    गोळी लागली नाही म्हणून दगडाने ठेचलं

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तौफिक शेख आणि त्याच्या साथीदारांनी गौरववर हल्ला केला. सुरुवातीला गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, गोळी लागली नाही. त्यानंतर आरोपींनी कोयता, दगड आणि विटांचा वापर करत गौरववर जोरदार हल्ला चढवला. डोक्यावर वार करत त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. हा संपूर्ण प्रकार पूर्वीच्या वादातून घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
    Maharashtra TimesMaharashtra Heatwave : महाराष्ट्रातील सात शहरे देशात सर्वाधिक उष्ण, दोन जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय
    याप्रकरणी पुणे पोलीस यांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध सुरू आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, एवढ्या निर्घृण पद्धतीने झालेल्या हत्येमुळे पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मध्यरात्री झालेल्या या हत्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पुण्यासारख्या शहरामध्ये वाढणारी गुन्हेगारी कमी कधी होणार? सुसंस्कृत शहरामध्ये आपणही सुरक्षित आहोत का? असे प्रश्न आता पुणेकरांच्या मानत निर्माण होत आहेत.
    Maharashtra TimesPune Heatwave : पुण्यात यंदा विक्रमी तापमान! उष्णतेची लाट तुलनेने दुर्मिळ आणि गंभीर

    सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

    पुण्यातल्या कात्रज परिसरात घडलेली एक हृदय पिळवटून टाकणारी घटना सध्या सगळ्यांच्याच मनाला अस्वस्थ करून जातेय. सासरी घरात सुरू असलेल्या सततच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेनं थेट स्वतःलाच पेटवून घेतलं, आणि काही दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा