• Mon. Jun 15th, 2026

    Pune Crime: पुण्यात शेजाऱ्याने चिमुकलीला आंब्याचं आमिष दाखवलं, नंतर केला अत्याचार; आईने पाहिल्याने संतापजनक घटना उघड

    Pune Crime: पुण्यात शेजाऱ्याने चिमुकलीला आंब्याचं आमिष दाखवलं, नंतर केला अत्याचार; आईने पाहिल्याने संतापजनक घटना उघड

    Pune Ns: घटनेबाबत पीडितेच्या आईकडून सविस्तर माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी वेगवान तपास केला आणि फरार झालेल्या नराधमाला अवघ्या काही तासांमध्ये अटक केली.

    अंगणात खेळणाऱ्या चिमुकलीला शेजाऱ्याकडून आंबा देण्याचं आमिष, नंतर केला अत्याचार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी-चिंचवड: पुण्यातून एक संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. आंब्याचे आमिष दाखवत अवघ्या अडीच वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून, यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी 47 वर्षीय विजय पोपट भोसले याला काळेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

    सविस्तर माहितीनुसार, आरोपी विजय भोसले हा काळेवाडी परिसरात आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. याच परिसरात पीडित चिमुरडीचं कुटुंबही राहतं. सोमवारी दुपारी पीडित चिमुरडी तिच्या दोन बहिणींसोबत घराजवळ खेळत होती. त्यावेळी आरोपीने आंबा देण्याचं आमिष दाखवत तिन्ही मुलींना जवळ बोलावलं. त्यानंतर दोन मुलींना बाहेर पाठवून, अडीच वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केला.

    दरम्यान, चिमुरडीची आई अचानक घटनास्थळी आली आणि तिने हा प्रकार प्रत्यक्ष पाहिला. हा प्रकार पाहून आईला मोठा धक्का बसला. तातडीने चिमुरडीला पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. वैद्यकीय तपासणीत तिच्यावर अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं.

    या घटनेची माहिती रुग्णालय प्रशासनाने काळेवाडी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पीडितेच्या आईकडून सविस्तर माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी फरार झालेल्या आरोपीला अवघ्या काही तासांत अटक केली.

    दरम्यान, शाळांमधून लहान मुलांना अनोळखी व्यक्तींच्या आमिषांना बळी पडू नये, असे शिकवले जाते. मात्र, ओळखीतीलच व्यक्ती असा घृणास्पद प्रकार करत असेल, तर मुलींच्या सुरक्षिततेचं काय, हा गंभीर प्रश्न या घटनेतून पुन्हा समोर आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास काळेवाडी पोलीस करत आहेत. या घटनेमुळे लहान मुलांच्या सुरक्षेबाबत समाजात पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा