Amravati Crime News: दारु अन् गांजासाठी सतत तगादा, रागाच्या भरात मुलाच्या हातून नको ते घडलं. पित्याचा गेला जीव. घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
धीरजने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. मृत जनार्दन केवदे यांना दारू आणि गांजाचे व्यसन होते. दारू आणि गांजासाठी ते पत्नी रेखा आणि मुलगा धीरज यांच्याकडे सतत पैशांची मागणी करत असत. पैसे न दिल्यास ते दोघांनाही शिवीगाळ करून मानसिक त्रास द्यायचे. रविवारी रात्रीदेखील राहत्या घरी याच कारणावरून मोठा वाद झाला. संतापलेल्या धीरजचा संयम सुटला आणि त्याने रागाच्या भरात वडिलांच्या डोक्यावर काठीने प्रकार केला. त्यात गंभीर जखमी झालेल्या जनार्दन यांचा मृत्यू झाला.
Crime News : अमरावतीत 180 मुलींना जाळ्यात ओढलं, हॉटेलवर शरीरसंबंधांचे 350 व्हिडिओ, मुंबई-पुण्यात विकण्याचा कट
घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू करून संशयावरून धीरजला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने वडिलांच्या छळाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे मान्य केले. सध्या आरोपी धीरज पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास वलगाव पोलिस करीत आहेत.
Koradi Plant Accident: कोराडी वीजनिर्मिती केंद्रात मोठी दुर्घटना; गरम राख पडल्याने 8 कामगार भाजले, चौघांची प्रकृती चिंताजनक
तर दुसऱ्या एका घटनेत, भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराची रस्त्याच्या कडेला असलेल्या दिशादर्शक फलकाला धडक बसली. या अपघातात त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी ११.३० वाजता लाखनी ते रेंगेपार कोठा रस्त्यावर घडली. रेंगेपार कोठा गावातील रहिवासी सुभाष श्यामराव काटगाये (४९) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मृताची ओळख राजू श्यामराव काटगाये (५३) अशी पटली आहे. राजू आपल्या दुचाकीने लाखनीवरून रेंगेपारकडे जात होते.
