Accident News: सागर यांनी बोनटला धरल्यामुळे, तब्बल ७० मीटर त्यांना फरफटत नेले. त्यानंतर ते खाली पाडल्यानंतर त्याच्या अंगावरून कार घातली आणि कारचालक पळून गेला.
हडपसर-सासवड मार्गावर थरकाप उडवणारी घटना; बसचालकाच्या अंगावर कार घातली(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
दिगंबर माने, म. टा. प्रतिनिधी, हडपसर: हडपसर-सासवड मार्गावर वडकीनाला येथे दारूच्या नशेतील एका कार चालकाने कारसमोर उभ्या असलेले तरुणाला चिरडल्याची घटना घडली आहे. सागर बाळासाहेब सायकर ( वय ४० रा. शेवाळवाडी पुणे ) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. कृष्णा गोपाळ कोईलवाड,( वय ३० सध्या रा. संजय हरपळे यांच्याकडे भाड्याने भेकराईनगर फुरसुंगी पुणे मूळ रा. तालुका चाकूर जिल्हा लातूर ) असे अटक केलेल्या कार चालकाचे नाव आहे. ही घटना रविवारी रात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी पाठलाग करून कार चालकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर ड्रंक अँड ड्राईव्ह गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर सायकर यांचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. सासवड येथील प्रवासी घेण्यासाठी दोन मिनी बस रविवारी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास शेवळवाडी येथून सासवडच्या दिशेने जात होत्या. एक बस सागर सायकर बस चालवत होते, दुसरी बस चालक अभिजीत जमदाडे हे चालवत होते. सागर यांची बस पुढे होती, तर जमदाडे यांची बस त्यांच्या मागे होती. व्यावसायिक इर्टिका कार ( एमएच १२ वाय क्यू १९४९ ) ही सुद्धा हडपसरकडून सासवडकडे जोरात जात होती. पुढे वडकीनाला येथे जमदाडे यांच्या मिनी बसला कार कट मारून पुढे गेली. सदर कारचालक हा जमदाडे यांच्या बसला पुढे जाण्यास रस्ता देत नव्हता. त्यावेळी जमदाडे यांनी पुढे जात असलेल्या दुसऱ्या मिनी बसचालक सागर सायकर यांना फोन करून सांगितले, की इर्टिका कार मला पुढे जाऊ देत नाही, त्याला थांबव. त्यामुळे सागर सायकर यांनी त्या इर्टिका कारला थांबवले आणि पळून जाऊ नये म्हणून कारसमोर जाऊन थांबले. मात्र यावेळी कार चालकाने समोरील सागर यांच्या अंगावर गाडी घातली.
दरम्यान, सागर यांना डोक्याला गंभीर मार लागल्याने ते रस्त्यावर पडून होते. त्याच ठिकाणी रस्त्याच्या पलीकडे किरकोळ अपघाताची माहिती घेत असताना पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती माने घटनास्थळी आले. त्यांनी इतरांच्या मदतीने तात्काळ जखमीला रुग्णालयात पाठवले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पोलिसांनी पसार झालेल्या इर्टिका कारचा शोध घेत त्याचा पाठलाग केला आणि कारचालकाला ताब्यात घेतले. कारचालक दारूच्या नशेत असल्याने पोलिसांनी तात्काळ त्याला मेडिकल करण्याकरता ससून रुग्णालयात पाठवले. तसंच रविवारी सायंकाळी चालकाविरोधात ड्रंक अँड ड्राईव्हचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र डावरे हे करत आहेत.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा