• Fri. Jun 5th, 2026

    Pune Water Cut : पुणेकरांनो पाणी जपून वापरा, संपूर्ण पुण्यात गुरुवारी पाणीपुरवठा बंद, शुक्रवारीदेखील पुरवठ्याच्या नियोजनात बदल

    Pune Water Cut : पुणेकरांनो पाणी जपून वापरा, संपूर्ण पुण्यात गुरुवारी पाणीपुरवठा बंद, शुक्रवारीदेखील पुरवठ्याच्या नियोजनात बदल

    No Water in Pune Thursday : गुरुवारी संपूर्ण पुण्यात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पर्वती, वारजे, लष्कर जलकेंद्रांमधील दुरुस्तीच्या कामामुळे पालिकेने हा निर्णय घेतला आहे. एवढच नाही तर शुक्रवारीही आता पाण्याचा पुरवठा हा पुणेकरांच्या सोयीवर परिणाम करणारा ठरणार आहे.

    गुरुवारी पुण्यात पाणी बंद(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : शहरातील पाणीपुरवठ्याबाबत महत्त्वाची घोषणा करण्यात आली असून गुरुवार (१६ एप्रिल) संपूर्ण पुण्यात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पुणे महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. महापालिकेच्या विविध जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये तसेच पंपिंग स्टेशनमध्ये तातडीच्या दुरुस्ती व देखभाल कामांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवार मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते गुरुवार मध्यरात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

    या ठिकाणी दुरुस्तीची कामे

    या कामांमध्ये नवीन व जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, खडकवासला जॅकवेल, वारजे, वडगाव, लष्कर जलकेंद्र आदी ठिकाणी विद्युत, पंपिंग व स्थापत्य दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश भागांना पाणीपुरवठा होणार नाही.

    या परिसरात परिणाम

    पर्वती जलसाठा क्षेत्रांतर्गत अनेक ठिकाणी पाणी मिळणार नाही. तसेच सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, कात्रज, धनकवडी, आंबेगाव, कोंढवा या भागांनाही फटका बसणार आहे.
    दरम्यान, हडपसर, मुंढवा, मांजरी, फुरसुंगी, खराडी, चंदननगर, विमाननगर, विश्रांतवाडी, लोहगाव या पूर्व भागातील परिसरातही पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पश्चिम भागातील कोथरूड, बावधन, वारजे, बाणेर, बालेवाडी, औंध, पाषाण, सुस रोड परिसरालाही याचा मोठा परिणाम होणार आहे.

    Maharashtra TimesKalyan-Ahilyanagar Highway Accident : कल्याण-नगर महामार्ग अपघातात एका कुटुंबातील तिघांसह महसूल अधिकारीही दगावला; आजी आश्चर्यकारकरीत्या बचावली, मृतांची नावे समोर

    महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (१७ एप्रिल) सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवावा व सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

    बालगंधर्व रंगमंदिरात “मँगो मस्ती”चा जल्लोष; ३ मिनिटांत ३ आंबे फस्त करत मुलांची धमाल स्पर्धा

    स्नेहल निमगिरे, पुणे : आंब्याचा सिझन सुरू होताच पुण्यात “मँगो मस्ती”चा रंगतदार उत्सव पाहायला मिळाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही “महाराष्ट्र माझा आंबा महोत्सव” अंतर्गत “आंबे खा स्पर्धा” मोठ्या उत्साहात पार पडली. ही अनोखी आणि आकर्षक स्पर्धा बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. लहान मुलांच्या उत्साहामुळे संपूर्ण परिसरात आनंदमय वातावरण निर्माण झाले होते.

    या स्पर्धेत एकूण ३५ लहान मुला-मुलींनी सहभाग घेतला. स्पर्धेचा मुख्य उद्देश फक्त आंबे खाणे नसून, आंब्याचा सिझन साजरा करणे आणि मुलांमध्ये आनंद निर्माण करणे हा होता. स्पर्धा सुरू होताच मुलांनी आंब्यांवर अक्षरशः ताव मारायला सुरुवात केली. काही मुलांनी वेगाने आंबे खाल्ले तर काहींनी हसत-खेळत गोड रसाचा आनंद घेतला. अवघ्या ३ मिनिटांत ३ आंबे फस्त करण्याचा विक्रमही काही मुलांनी केला.

    स्पर्धेदरम्यान आंब्याचा रस सर्वत्र पसरल्याने मुलांचे हात आणि चेहरे पूर्णपणे रंगून गेले होते. हे दृश्य पाहून उपस्थित पालक आणि प्रेक्षकांनीही टाळ्यांचा गजर केला. लहान मुलांच्या निरागसतेमुळे आणि उत्साहामुळे कार्यक्रम अधिकच रंगतदार झाला.

    या स्पर्धेत ओम प्रफुल्ल शिंदे या मुलाने केवळ २ मिनिटांत ३ आंबे खाऊन पहिला क्रमांक पटकावला. त्याच्या वेगवान आणि उत्साही सहभागाचे सर्वांनी कौतुक केले. तर अनवी आणि सानवी या मुलींनी आंबा खाताना चेहरा आणि हात सर्वाधिक रंगवत विशेष आकर्षण निर्माण केले. त्यांच्या आनंदी प्रतिक्रियांमुळे वातावरण अधिकच हसतमुख झाले.
    विजेत्या मुला-मुलींना बक्षीस म्हणून आंब्यांची पेटी देण्यात आली. तसेच सर्व सहभागी मुलांना प्रमाणपत्रे आणि आंब्यांचा गोड आस्वाद देण्यात आला. मुलांनी मिळालेल्या बक्षिसांमुळे आनंद व्यक्त केला.

    या कार्यक्रमाला मनसेचे सरचिटणीस गणेश सातपुते, गणेश धुमाळ, बाळासाहेब ढमाले, मयूर चिल्लाळ, रूपाली भुजबळ, तेजस्विनी धुमाळ तसेच अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते. आयोजकांनी सांगितले की, अशा स्पर्धांमुळे मुलांमध्ये आनंद, एकता आणि स्थानिक फळांबद्दल आकर्षण वाढते.

    आंब्याच्या गोड सुवासाने आणि मुलांच्या हास्याने बालगंधर्व रंगमंदिर परिसर “मँगो फेस्टिव्हल”सारखा फुलून गेला होता. कार्यक्रमाचा शेवट टाळ्यांच्या गजरात आणि आनंदी आठवणींसह झाला.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा