• Sat. Jun 6th, 2026
    Ashok Kharat प्रकरणात ED ॲक्शन मोडमध्ये, पुण्यात 3 ठिकाणी छापे, नाशिकमध्ये खरातच्या घराची 12 तासांपासून झाडाझडती

    भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात ईडी ॲक्शन मोडमध्ये आली आहे. ईडीकडून अशोक खरात याच्या नाशिक येथील बंगल्याची गेल्या 12 तासांपासून झाडाझडती घेतली जात आहे. तर पुण्यातही ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : ईडीचं पथक सोमवारी पहाटे सहा वाजेपासून नाशिकमध्ये दाखल झालं आहे. नाशिकच्या कर्मयोगी नगर येथे असलेल्या ‘तृप्तबाला’ या बंगल्यात ईडीने छापा टाकला. गेल्या 12 तासांपासून इथे ईडीकडून झाडाझडती सुरु आहे. इनकम टॅक्स आणि ईडी या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांकडून संयुक्तपणे कारवाई केली जात आहे. 5 पुरुष आणि 2 महिला अधिकारी अशा एकूण 7 जणांच्या पथकाकडून अशोक खरातच्या घराची झडती घेतली जात आहे. अशोक खरातची बेईनामी मालमत्ता, गैरव्यवाहर याबाबत सखोल तपास केला जात आहे. ईडी, इनकम टॅक्सकडून कागदपत्रांची तापसणी केली जात असल्याची माहिती आहे. तसेच पुण्यातही मोठ्या घडामोडी सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

    पुण्यात 3 ठिकाणी छापेमारी

    राज्यभर चर्चेत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरातची अनेक स्तरातून चौकशी होत आहे. खरातसह त्याच्याशी संबंधित असणाऱ्या अनेक सहकाऱ्यांची देखील चौकशी होत आहे. अशातच मागील काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेले पुण्यातील धागेदोरे पुन्हा समोर आले आहेत. अशोक खरातच्या संबंधित ट्रस्ट वरती पाच वर्ष ट्रस्टी म्हणून राहिलेले CA ललित पोफळे यांच्या पुण्यातील घरावर ED ने धाड टाकली आहे. आज सकाळी सात वाजल्यापासून पुण्यातील तीन ठिकाणी धाड टाकले असून कागदपत्रांची आणि इतर कार्यालयाची चौकशी करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सीए ललित पोफळे याचे खरातशी आर्थिक संबंध असल्याचे प्रकरण बाहेर आले होते. त्यांच आर्थिक व्यवहार सीए ललित पोफळे पाहत असल्याची माहिती देखील मिळाली होती. अगदी कमी दिवसातच पोफळे कुटुंबीयांच्या संपत्तीमध्ये झालेली वाढ यावरती देखील अनेक सामाजिक राजकीय व्यक्तींनी आरोप केले होते, शंका व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर आता ईडीचे देखील लक्ष या आरोपांनी पोकळे कुटुंबीयांवर केंद्रित केले होते.

    मात्र ललित पोफळे यांनी माझे खरातशी आता संबंध नसल्याचे सांगितले होते. मात्र आज ED ने धडक कारवाई करत ललित पोकळे यांच्या घरावर धाड टाकले आहे आणि चौकशी सुरू आहे. या चौकशीमध्ये नेमके अशोक खरातचे आणि सीए ललित पोफळेचे आर्थिक धागेदोरे अशा पद्धतीने बाहेर येणार आर्थिक गैरव्यवहार किती प्रमाणात झाले आहेत याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

    शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर यांची 8 तास चौकशी

    दुसरीकडे राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर यांची आज शिर्डी पोलिसांकडून तासंतास चौकशी करण्यात आली. शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर यांची आठ तास चौकशी केली. शिर्डी पोलिसांकडून समता पतसंस्थेत असलेल्या खात्यांसंदर्भात चौकशी करण्यात आली. शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर यांच्यासह त्यांचा मुलगा चिन्मय याचाही जबाब नोंदवण्यात आला.

    समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर यांच्या नावावर दोन खाते तर मुलाच्या नावावरही दोन खाते असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या खात्यांना भोंदू अशोक खरात वारसदार आहे. या खात्यांवरून 2 कोटी 40 लाखांचा व्यवहार झाला आहे. हे खाते मी उघडले नसल्याचा जबाब प्रतिभा चाकणकर यांनी दिला आहे. खात्यावरून स्वतः कोणताही व्यवहार केला नाही. देवदर्शनाच्या नावाखाली कल्पना खरातने कागदपत्र घेतली होती. व्हाट्सपवर पाठवलेल्या कागदपत्रांचा अशोक खरातने खाते उघडण्यासाठी वापर केला, असा जबाब प्रतिभा चाकणकर यांनी दिला.

    समता पतसंस्थेच्या शाखेत ईडीची धाड

    विशेष म्हणजे ईडीच्या पथकाने शिर्डी परिसरातही धाड टाकली. समता पतसंस्थेच्या राहाता शाखेत ED चे पथक दाखल झाले. समता पतसंस्थेत अशोक खरात नॉमिनी असणारी 100 खाती आहेत. या खात्यांवरून 60 कोटींहून अधिकचा व्यवहार झाल्याची माहिती आहे. एकीकडे शिर्डी पोलिसांकडून तपास सुरू असताना दुसरीकडे ED ने देखील तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. अशोक खरात याच्या मालमत्ता आणि पतसंस्थांमधील कोट्यवधींच्या व्यवहारासंबंधी ED कडून तपास सुरु आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा