Rajgad Taluka News: एकाच घरातील दोन कर्ते पुरुष अशा प्रकारे निघून गेल्याने गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पुण्यातील माजी सरपंच भावासह धरणावर गेले, पण मोटार दुरुस्त करताना बसला विजेचा धक्का(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्नेहल निमगिरे, पुणे : पुणे जिल्ह्यातील राजगड (वेल्हे) तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी धक्कादायक घटना घडली असून घेवंडे गावात शेतीसाठी नदीपात्रात पाण्याची मोटार बसवताना अचानक शॉक लागून दोन सख्ख्या शेतकरी भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दामाजी भाऊराव गायकवाड व त्यांचे बंधू दत्तात्रय भाऊराव गायकवाड अशी दुर्घटनेत मृत झालेल्या दोघांची नावे आहेत. या घटनेने संपूर्ण गाव सुन्न झालं आहे. दामाजी गायकवाड हे निव्ही-घेवंडे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच होते. गावासाठी झटणारा, लोकांच्या अडचणीला धावून जाणारा माणूस अशी त्यांची ओळख. त्यामुळे त्यांच्या अचानक जाण्याने गावावर जणू दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी दोन्ही भाऊ गुंजवणी धरणाच्या फुगवटा क्षेत्रात शेतीच्या कामासाठी गेले होते. पाण्याची विद्युत मोटार दुरुस्त करत असताना अचानक विद्युत प्रवाह उतरला आणि दोघांनाही जबर शॉक बसला. त्या धक्क्यातच त्यांचा तोल गेला आणि ते थेट खोल पाण्यात पडले आणि काही क्षणांत सगळं काही संपलं.
घटनेची माहिती मिळताच गावकरी अक्षरशः धावतच घटनास्थळी पोहोचले. कोणी पाण्यात उतरून शोध घ्यायचा प्रयत्न केला, तर कोणी प्रशासनाला या दुर्घटनेबाबत कळवलं. लगेच बचाव पथकही दाखल झालं. मात्र पाण्याची खोली, अंधार आणि परिस्थिती कठीण असल्यामुळे शोधकार्याला मोठ्या अडचणी आल्या. तरीही ग्रामस्थ आणि पथकाने हार न मानता अनेक तास प्रयत्न सुरू ठेवले. अखेर रात्री उशिरा दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं. पण तोपर्यंत सगळं काही हातातून निसटलं होतं.
या घटनेनंतर गावात सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात असून “अशी उमदी माणसं पुन्हा होणार नाहीत,” असं म्हणत गावकरी दोघांबद्दलच्या आठवणी सांगत आहेत.
दरम्यान, दामाजी गायकवाड यांनी सरपंचपदाच्या काळात गावासाठी अनेक विकासकामं केली होती. लोकांमध्ये मिसळणारा, सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा नेता अशी त्यांची ओळख होती. दोघे भाऊ अचानक निघून गेल्याने घेवंडे गावावर शोककळा पसरली आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा