• Fri. Jun 5th, 2026
    भावाला पासवर्ड पाठवला, डॉ दाभाडेंनी जीव दिला; अंत्यविधीनंतर दादाने फोन उघडताच धक्का, शरीरसंबंधाला प्रवृत्त करत टोक गाठलं

    Dr Mandar Dabhade Death Case : डॉ मंदार दाभाडे यांची एका सहकाऱ्याच्या घटस्फोटित बहिणीसोबत ओळख होती. तिने मंदार यांना स्वतःचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅट्स पाठवत शरीरसंबंधांसाठी प्रवृत्त केलं होतं. त्यानंतर तिने ‘मी गर्भवती असून माझ्याशी लग्न कर, नाहीतर मी विष पिऊन जीव देईन आणि तुझं नाव लिहीन’ अशी धमकी देत सातत्याने ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुकेशनी नाईकवाडे, बीड : 29 वर्षीय डॉक्टर मंदार उमेश दाभाडे यांच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या डॉ. दाभाडेंनी चनई रोड भागातील संत रोहिदास नगर येथे भाड्याने वास्तव्यास असलेल्या घरात गळफास घेतल्याची घटना ६ एप्रिल २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास समोर आली होती. महिला सहकाऱ्याच्या जाचाला कंटाळून त्यांनी आयुष्याची अखेर केल्याची माहिती समोर आली आहे.

    भावाला पासवर्ड पाठवला

    डॉ मंदार दाभाडे आपल्या घराचे दार उघडत नसल्याने शेजाऱ्यांना संशय आला होता. त्यामुळे पोलिसांच्या मदतीने दार उघडण्यात आल्यावर सर्वांना मोठा धक्का बसला. या प्रकरणाचा उलगडा अतिशय फिल्मी पद्धतीने झाला. कारण मृत्यूपूर्वी डॉक्टर दाभाडे यांनी आपल्या भावाच्या मोबाईलवर पाठवलेल्या एका पासवर्डमुळे या प्रकरणातील धक्कादायक वास्तव उघड झालं.

    महिलेच्या त्रासाला कंटाळून जीव दिला

    एका महिला सहकाऱ्याच्या जाचाला कंटाळून त्यांनी जीव दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी भावाने दिलेल्या तक्रारीनंतर अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. मंदार यांनी जीव देण्यापूर्वी भाऊ लौकिक दाभाडे यांना त्यांच्या मोबाईलचा पासवर्ड पाठवला असल्याचा खुलासा करण्यात आला होता.
    Maharashtra TimesMathura Boat Accident VIDEO : एका क्षणी ओठी भजनं, पुढच्याच क्षणी किंकाळ्या! मथुरा बोट दुर्घटनाग्रस्तांचा शेवटचा व्हिडिओ समोर

    सॉरी पप्पा व भैया

    मयत डॉ मंदार दाभाडे यांचे अंत्यविधी आटोपल्यानंतर लौकिक यांनी तो पासवर्ड वापरुन मंदार यांचा मोबाईल उघडला असता, त्यामध्ये एक धक्कादायक सुसाईड नोट आढळून आली. त्यात मंदार यांनी ‘सॉरी पप्पा व भैया’ असे म्हणत आपल्या वडिलांची आणि भावाची माफी मागितली. स्वतःवर ओढवलेल्या प्रसंगाचे वर्णन केले आहे.

    Asha Bhosale यांचे मुख्याध्यापक सांगतायत हायस्कूलमधील मुलाखतीच्या आठवणी, ऐका किस्सा

    शरीरसंबंधांसाठी प्रवृत्त

    डॉ मंदार दाभाडे यांचे एका सहकाऱ्याच्या घटस्फोटित बहिणीसोबत (मूळ रा. छत्रपती संभाजीनगर, ह.मु. रोहिदास नगर, चनई रोड, अंबाजोगाई) ओळख होती. तिने मंदार यांना स्वतःचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅट्स पाठवून शरीरसंबंधांसाठी प्रवृत्त केले होते. त्यानंतर तिने ‘मी गर्भवती असून माझ्याशी लग्न कर, नाहीतर मी विष पिऊन जीव देईन आणि सुसाईड नोटमध्ये तुझं नाव लिहीन’ अशी धमकी देत सातत्याने ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली असल्याचे देखील त्या नोट मध्ये लिहिले असल्याचे सांगण्यात आले आहे. या सततच्या मानसिक त्रासामुळे आणि बदनामीच्या भीतीने डॉक्टर मंदार दाभाडे खचून गेले आणि त्यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.
    Maharashtra TimesDosa Batter Death : मुलाच्या जन्माचा हव्यास, उंदीरनाशकाची दहा पाकिटं, आत्या-मावशांची चौकशी; डोसा पीठ केसमध्ये फास आवळला, अटकेची टांगती तलवार
    या प्रकरणाच्या अनुषंगाने समोर आलेल्या धक्कादायक खुलाशानंतर डॉ मंदार दाभाडे यांचा भाऊ लौकिक दाभाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबाजोगाई येथील शहर पोलिस ठाण्यातीन पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ नुसार जीव देण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक ससाणे करत असल्याचे सांगण्यात आले आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा