• Sun. Jun 14th, 2026

    Satara Crime: अरे, मुलगा तुझ्यासारखा दिसत नाही; मित्रांचे टोमणे, पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पोराला संपवलं, साताऱ्यातील मृत्यू प्रकरणाचं गूढ उकललं

    Satara Crime: अरे, मुलगा तुझ्यासारखा दिसत नाही; मित्रांचे टोमणे, पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पोराला संपवलं, साताऱ्यातील मृत्यू प्रकरणाचं गूढ उकललं

    Karad Murder Case: विजापूर आणि सातारा पोलिसांच्या तपासातून अखेर मुलाच्या हत्येचे गूढ उकलले.

    अरे, मुलगा तुझ्यासारखा दिसत नाही; मित्रांचे टोमणे, पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पोराला संपवलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुधीर पाटील, सातारा : कराड तालुक्यातील कृष्णा नदीपात्रात आढळून आलेल्या सहा वर्षाच्या मुलाच्या मृतदेहाचे गूढ अखेर उकलले आहे. सिद्धार्थ मल्लिकार्जुन आरकेरी (वय ६ वर्षे, रा. नागठाणे, ता. विजापूर, कर्नाटक), असे मृत मुलाचे नाव असून जन्मदात्या पित्यानेच त्याला नदीत फेकून पोटच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली आहे. गेल्या दीड वर्षापासून तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत हा मुलगा माझा नाही म्हणत होता. तसेच त्याचे मित्रही टोमणे मारायचे. त्याला वैतागून मुलाला नदीत ढकलून दिल्याची कबुली जन्मदात्या पित्याने दिली आहे.

    संशयित आरोपी मल्लिकार्जुन आरकेरी हा कुटुंबासह कर्नाटकातील नागठाणे (ता. विजापूर) येथे राहत आहे. १६ मार्च रोजी मुलाला नवीन कपडे घालून त्याला नागठाणे शाळेत सोडण्यासाठी घेऊन गेला होता. मात्र, तो एकटाच घरी परतला. पत्नीने विचारले असता तो विसंगत उत्तरे देत होता. म्हणून पत्नीने मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार विजापूर पोलीस ठाण्यात दिली होती.

    कराड तालुक्यातील मसूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडोली भिकेश्वर गावच्या हद्दीत कृष्णा नदीपात्रात १८ मार्च रोजी ६ वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळून आला. मुलाच्या अंगावर नवीन कपडे होती. तो मृतदेह मजुराच्या मुलाचा असावा, याचा अंदाज पोलिसांना आला होता. त्यादृष्टीने पोलिसांनी परिसरातील वीटभट्टीवर कुणाचा मुलगा बेपत्ता आहे का, याची चौकशी केली. मात्र, मुलाची ओळख पटत नव्हती. कपडे आणि शारीरिक वर्णनावरून तो कर्नाटकातील असल्याचा अंदाज आल्याने कन्नड भाषेत माहिती व छायाचित्रे नॅशनल क्राईम ब्युरोवर अपलोड केली होती.

    ती माहिती मृत मुलाच्या वर्णनाशी जुळत असल्याने विजापूर पोलिसांनी मसूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पत्नीच्या चारित्र्यावर संशय आणि मुलगा तुझ्यासारखा दिसत नसल्याचे मित्र टोमणे मारत असल्याने मुलाला नदीत ढकलून दिल्याची कबुली अखेर जन्मदात्या पित्याने दिली. काही वर्षांपूर्वी तो कृष्णा नदीकाठच्या वाळू उपसा ठेक्यावर कामाला होता. त्यामुळे त्याला या परिसराची माहिती होती, अशी माहितीही आरोपीने पोलिसांना दिली.

    मसूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आदिनाथ खरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार सुधाकर भोसले, प्रदीप पाटील, अमोल पवार, महेश लावंड, पोलिस पाटील राजू रामगुडे, मदतनीस किशोर कीर्तवडे यांच्यासह विजापूर ग्रामीणचे डीवायएसपी टी. एस. सुलपी, पोलिस निरीक्षक एच. बी. इंगळेश्वर यांनी या गुन्ह्याचा छडा लावला.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा