Mulund Railway Station Accident: मुलुंड रेल्वे स्थानकावर दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत चालली आहे. गुरूवारी जलद लोकल पकडण्याच्या नादात शहरातील एका व्यावसायिकाने आपला पाय गमावला. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा शनिवारी मृत्यू झाला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: धावत्या लोकलमधून पडून होणाऱ्या मृत्यूची संख्या वाढत चालली आहे. आता काही दिवसांपूर्वीच मुलुंड रेल्वे स्थानकावर अशीच एक घटना घडली. एका व्यावसायिकाने धावत्या जलद लोकलमध्ये चढण्याच्या प्रयत्नात आपला एक पाय गमावला होता. त्यानंतर शनिवारी उपचारादरम्यान या व्यावसायिकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नेमकं काय घडलं?
मुलुंड रेल्वे स्थानकावर 9 एप्रिल रोजी ही घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. व्यावसायिकाचे नाव किर्ती विरा असून ते 71 वर्षांचे होते. मुलुंड पश्चिमेतील ते रहिवासी होते. मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये ते काही वस्तू विकायचे. 9 एप्रिल रोजी, सायंकाळी 5.30 च्या सुमारास ते प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरून जलद लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी लोकलखाली येऊन ते गंभीर जखमी झाले. मुलुंड रेल्वे स्थानकावर जलद लोकलची वारंवारता कमी असल्यामुळे त्यांनी ही धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न केला.Mumbai Local: आंबेडकर जयंतीनिमित्त विशेष लोकल; CSMT-कल्याण, पनवेल मार्गावर मध्यरात्री अतिरिक्त फेऱ्या; कसं असेल वेळापत्रक?
ट्रेन खाली येताच ते ट्रेनसोबत काही अंतरावर ओढले गेले. त्यावेळी त्यांच्या एक पाय गुडघ्यापासून वेगळा झाला. त्यांनी तातडीने अगरवाल रुग्णालयात भरती करण्यात आले. नंतर त्यांना मुलुंड येथील फोर्टीस रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, शनिवारी त्यांचा मृत्यू झाला.
जनरल डब्यात चढताना अपघात
नेहमी सायंकाळी 4 वाजता मशीद बंदरसाठी मुलुंडहून निघणाऱ्या किर्ती विरा यांना गुरूवारी उशीर झाला होता. त्या दिवशी त्यांना अचानक झोप लागल्यामुळे ते घरातून 5 नंतर निघाले. उशीर झाल्यामुळे ते ठाण्यावरून सीएसएमटीकडे जाणारी जलद लोकल पकडण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना फर्सट क्लासच्या डब्यामध्ये चढायचे होते. परंतु, लोकल हलू लागल्याने त्यांनी जनरल डब्यात चढण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी ते फलाटावरून थेट ट्रेन खाली खेचले गेले.
Mumbai Local Ticket: ‘रेलवन’मुळे फुकट्यांची मजा! टीसी दिसताच तिकीट काढण्याची चलाखी; धावत्या एसी लोकलमध्ये सर्वाधिक घटना
काही दिवस त्यांच्यावर अगरवाल रुग्णालयात उपचार केल्यानंतर कुटूंबियांनी त्यांना फोर्टीस रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. शनिवारी त्यांना रुग्णवाहिकेतून फोर्टीस येथे घेऊन जाण्यात येत होते. परंतु, याचवेळी त्यांची प्रकृती अचानक खालावली. शनिवारी सायंकाळी 6.23च्या दरम्यान रुग्णवाहिकेतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे विरा परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा