• Tue. Jun 16th, 2026
    Satara Crime : वरच्या सिग्नलची वायर कट, खालच्या सिग्नलवर जाड कापड बांधून Sahyadri Expressला थांबवलं; साताऱ्यात रेल्वे प्रवाशांना लूटलं

    Satara Sahyadri Express News : सातारा जिल्ह्यात मोठी घटना घडली आहे. सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा पडला आहे. रेल्वेच्या सिग्नलमध्ये बिघाड करून प्रवाशांना लुटले आहे

    सह्याद्री एक्स्प्रेस प्रवाशांना लूटलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुधीर पाटील, सातारा : कोल्हापूरहून पुण्याकडे निघालेल्या सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा टाकून प्रवाशांच्या दागिन्यांची लूट करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील शेणोली स्टेशन (ता. कराड) हद्दीत आज शनिवारी पहाटे ही घटना घडली असून अवघ्या २५ मिनिटांत सुमारे ५५ हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. वरच्या सिग्नलची वायर कट करून आणि खालच्या सिग्नलवर जाड कापड बांधून मोटरमनला गाडी थांबवण्यास भाग पाडून ही लूट करण्यात आली आहे.

    सिग्नल बंद दिसताच रेल्वे थांबली

    मिरज रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेली सह्याद्री एक्सप्रेस पहाटेच्या सुमारास सातारा व सांगली जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या शेणाली स्टेशन येथे आली. त्याठिकाणचा सिग्नल बंद होता. त्यामुळे मोटरमनला गाडी थांबवावी लागली. गाडी थांबताच तीन चोरट्यांनी खिडकीच्या बाजूला बसलेल्या प्रवाशांच्या गळ्यातील दागिने हिसकावले. तसेच एका प्रवाशाचा मोबाईल देखील चोरला. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार तीन संशयितांनी ही लूट केली आहे.
    Maharashtra TimesAsha Bhosle Hospitalized: ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा सौम्य झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
    मिरज रेल्वे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुभाष मुंडे यांनी सांगितले की, शेणोली स्टेशन हद्दीतील वरच्या सिग्नलची वायर चोरट्यांनी कट केली होती, तर खालच्या सिग्नलला जाड कापड बांधले होते. सिग्नल मिळत नसल्याने काही तरी धोका असावा, या शक्यतेने मोटर म्हणणे गाडी थांबवली. ती संधी साधून चोरट्यांनी अवघ्या २० ते २५ मिनिटात दरवाजात आणि खिडकी कडेला बसलेल्या प्रवाशांचे दागिने आणि मौल्यवान वस्तू, असा 55 हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला.

    सिग्नलवरील कापड काढून सिग्नल पुर्ववत

    सिग्नल न मिळाल्याने सह्याद्री एक्सप्रेस थांबल्याची माहिती मिळताच शेणोली व भवानीनगर रेल्वे स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन सिग्नलवरील कापड काढून सिग्नल पुर्ववत कार्यान्वित केला. त्यानंतर सह्याद्री एक्सप्रेस पुढे मार्गस्थ झाली. सुमारे पावणे तीन वाजण्याच्या सुमारास सह्याद्री एक्सप्रेस कराड रेल्वे स्टेशनला आल्यानंतर प्रवाशांनी चोरीच्या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना दिली.
    Maharashtra TimesPune Crime : पुणे खंडणी प्रकरण; रीलस्टार सोनाली हिंगेसह दोघं पोलीस कर्मचारी निलंबित, तपासात नवे धागेदोरे उघड
    सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा पडल्याची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिस व रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे फिरवली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी पुणे, सोलापूर व मिरजहून तीन श्वान पथकांना पाचारण करण्यात आले. मात्र चोरट्यांचा माग काढण्यात यश आले नाही. या घटनेची नोंद मिरज रेल्वे पोलीस ठाण्यात झाली असून उपनिरीक्षक सुभाष मुंढे हे अधिक तपास करत आहेत.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा