Beed Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच बीडमध्ये एक मोठी घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
बीड अल्पवयीन मुलीवर अत्याचार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुनील जाधव, बीड : बीड जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी आणि अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील चुलत चुलत्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली असून, या कृत्यामुळे बसलेला मानसिक धक्का सहन न झाल्यानं पीडितेने विष प्राशन करून आपलं जीवन संपवलं आहे. दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, ज्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.
असा घडला होता प्रकार
पीडित मुलगी ही १०वीतशिकत होती. दोन दिवसांपूर्वी ती आपल्या घराच्या पाठीमागील गोठ्यातून काम आटोपून घराकडे परतत असताना नराधम चुलत चुलत्याने तिचा रस्ता अडवला. तिला बळजबरीने बाजेवर पाडून तिच्यावर अत्याचार केला. धक्कादायक बाब म्हणजे, ही घटना उघड करू नये यासाठी आरोपी आणि त्याच्या पत्नीने पीडितेवर दबाव टाकला. ‘काही सांगितल्यास जिवंत मारून टाकू,’ अशी धमकी या दाम्पत्याने पीडितेला दिली होती.Pune Crime : पुणे खंडणी प्रकरण; रीलस्टार सोनाली हिंगेसह दोघं पोलीस कर्मचारी निलंबित, तपासात नवे धागेदोरे उघड
मानसिक धक्क्यातून टोकाचं पाऊल
ज्या नात्यावर विश्वास ठेवायचा, त्याच रक्ताच्या नात्यातील व्यक्तीने इतके घाण कृत्य केल्यानं पीडित मुलगी पूर्णपणे खचून गेली होती. आपल्याच घरात आपण सुरक्षित नसल्याची जाणीव आणि झालेला अपमान तिला सहन झाला नाही. या मानसिक त्रासातून तिने राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तिची प्रकृती बिघडल्यानंतर कुटुंबियांनी तिला तातडीने केज येथील रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक असल्यानं पुढील उपचारासाठी तिला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. तिथे डॉक्टरांनी तिला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, परंतु दुर्दैवाने उपचारादरम्यान तिने अखेरचा श्वास सोडला.
मुख्य आरोपी केला अटक, पत्नी फरार
घटनेचे गांभीर्य ओळखून पीडितेच्या पालकांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी केज ग्रामीण पोलीस ठाण्यात बलात्कार, धमकी आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेचा चुलत चुलता आणि त्याची पत्नी या दोघांनाही आरोपी करण्यात आलं आहे. पोलिसांनी मुख्य आरोपीला तत्काळ ताब्यात घेतलं असून, त्याच्या पत्नीचा शोध घेण्यासाठी विशेष पथकं रवाना करण्यात आली आहेत.
Jalna Crime : घरासमोर झोपलेला असताना अज्ञातांकडून हल्ला, मध्यरात्री तरुणाला निर्घृणपणे संपवलं; घरातल्यांना थांगपत्ताही नाही
आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी
या घटनेनंतर बीड जिल्ह्यात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. गावात शोककळा पसरली असून, आरोपींना कठोर फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. एका कोवळ्या जीवाला अशा प्रकारे क्रूरतेचा बळी पडावं लागल्यानं समाजाच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास जलदगतीने करून पीडितेला न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा