Central Railway: मुंब्रा दुर्घटनेनंतर मुंबईमध्ये बंद दरवाजे असलेल्या लोकलची गरज जाणवली होती. त्यानंतर 2025मध्ये दाखल होणाऱ्या लोकलला विलंब झाला होता. आता अखेर एप्रिल महिन्यात ही लोकल मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे.
म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मध्य रेल्वेवरील सर्वसामान्य प्रवाशांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. स्वयंचलितपणे दरवाजे उघड-बंद होणारी बारा डब्यांची विनावातानुकूलित लोकल चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमधून (आयसीएफ) मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे. मुंब्रा दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबईसाठी या लोकलची घोषणा केली होती. नोव्हेंबर २०२५ मध्ये मुंबईत लोकल दाखल होणे अपेक्षित असताना एप्रिल २०२६ मध्ये ही लोकल येत आहे. ही लोकल मुंबईत आल्यानंतर तिची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर लोकल प्रवासी सेवेत दाखल करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
मुंब्रा स्थानक परिसरात ९ जून २०२५ मध्ये सीएसएमटी-कर्जत आणि कसारा-सीएसएमटी लोकलमधून १३ प्रवासी पडले. दुर्घटनेत चार प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर धावत्या लोकलमधून लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला. प्रवाशांचासी रोष कमी करण्यासाठी विनावातानुकूलित, स्वयंचलितपणे दरवाजे उघड-बंद होणाऱ्या लोकलची बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. रिसर्च डिझाईन अँड स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशनकडून रेल्वेगाडीची स्थिरता, वेग, सुरक्षितता यांबाबत चाचण्या घेण्यात येणार आहेत. त्यानंतर प्रवासी चाचणीदेखील होईल. सर्व चाचण्यांनंतर गाडी प्रवासी सेवेत दाखल करण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. पश्चिम रेल्वेवर सन २०१९ मध्ये घेतलेल्या विनावातानुकूलित दरवाजे बंद लोकलची चाचणी अयशस्वी झाल्याने हा प्रयोग बारगळला होता.
Mumbai Local : मध्य रेल्वे लोकलमध्ये 100 फेरीवाल्यांना अधिकृत मान्यता, तीन वर्षात 1.32 कोटी परवाना शुल्क मिळणार, प्रवाशांचा तीव्र संताप
वायुविजन, जोडलेले डबे
मुंबई लोकलमधील गर्दी लक्षात दरवाजे बंद केल्यानंतर प्रवासी गुदमरण्याची शक्यता आहे. यामुळे नव्या लोकलमध्ये वायुविजन यंत्रणेची विशेष व्यवस्था असेल. नव्या लोकलमध्ये दरवाजातून हवा खेळती राहण्यासाठी सछिद्र आणि पट्ट्यांचे दरवाजे असणार आहेत. एका डब्याची अन्य डब्यांना जोडणी असल्याने त्यामुळे गर्दी विभागणे शक्य होणार आहे.
Mumbai Metro : मेट्रोचा प्रवास आता होणार स्वस्त; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी तिकिटांमध्ये 25 टक्के सवलत, काय आहे ही ऑफर?
बसचालकाला बेदम मारहाण
दरम्यान, मिरा-भाईंदर महापालिकेच्या परिवहन विभागाच्या ठाण्याकडे जाणाऱ्या बसच्या चालकाला बसमधून बाहेर काढून दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली. यात बसचालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा