• Thu. Jun 18th, 2026
    मध्य रेल्वे लोकलमध्ये 100 फेरीवाल्यांना अधिकृत मान्यता, तीन वर्षात 1.32 कोटी परवाना शुल्क मिळणार, प्रवाशांचा तीव्र संताप

    Street Vendor on Mumbai Local : गर्दीवर तोडगा निघत नसतानाच मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये फेरीवाल्यांना अधिकृतपणे मान्यता देण्याचा धक्कादायक निर्णय प्रशासनाने घेतला आहे

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मध्य रेल्वेवर १५ डब्यांचा धीम्या गतीने होणारा विस्तार, एसी लोकलमुळे कोलमडलेला वक्तशीरपणा यामुळे रेल्वेगाड्यांमधील प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. या गर्दीवर तोडगा निघत नसतानाच मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये फेरीवाल्यांना अधिकृतपणे मान्यता देण्याचा धक्कादायक निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार शंभर फेरीवाल्यांना मंजुरी देण्यात आली आहे. गर्दीच्या रेट्यामुळे पडून होणारे मृत्यू रोखण्यात अपयशी ठरलेल्या मध्य रेल्वेला आता प्रवाशांच्या जिवापेक्षा महसूल महत्त्वाचा असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

    टप्प्याटप्प्याने अधिकृत विक्रेते

    सीएसएमटी–कल्याण लोकल गाड्यांमध्ये खाद्यपदार्थ व इतर वस्तूंच्या विक्रीसाठी टप्प्याटप्प्याने अधिकृत विक्रेते नेमण्यात आले आहेत. २२ डिसेंबर २०२५ पासून या निर्णयाची अंमलबजावणी झाली असून या विक्रेत्यांना २१ डिसेंबर २०२८ पर्यंत सर्व उपनगरी गाड्यांमध्ये विक्रीची मुभा देण्यात आली आहे. करारातून मध्य रेल्वेला वार्षिक ४४ लाख रुपये परवाना शुल्क मिळणार असून, तीन वर्षांचे एकूण करारमूल्य एक कोटी ३२ लाख तीन हजार रुपये आहे.
    Maharashtra Timesमुंबईहून एअर इंडिया विमान उडालं, काही मिनिटातच वैमानिक ‘पॅन पॅन’ ओरडला, प्रवासी भिजलेले, फ्लाईट परतलं; PAN PAN Call म्हणजे काय?

    प्रवासी महासंघाचं पत्र

    आधीच लाखो प्रवासी जीव मुठीत धरून प्रवास करत असताना लोकलमध्ये फेरीवाल्यांची भर घालणे म्हणजे गर्दी, चेंगराचेंगरी आणि अपघातांना खुले आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाने मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांना पत्र पाठवले आहे. एसी केबिनमध्ये बसून निर्णय घेण्यापूर्वी अधिकाऱ्यांनी एकदा सकाळ-संध्याकाळ गर्दीत सीएसएमटी ते कल्याण असा प्रवास करावा. त्यानंतर महसूल वाढवण्यासाठी असे निर्णय घ्यावेत. मुंबई आणि उपनगरातील लोकप्रतिनिधींनी या निर्णयाबाबत रेल्वे प्रशासनाला जाब विचारावा आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय तातडीने मागे घेण्यासाठी हस्तक्षेप करावा, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून करण्यात येत आहे.

    Supriya Sule | वहिनी सुनेत्रा पवारांच्या प्रचारात उतरणार?, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

    Maharashtra TimesCrime News : नवरा शरीरसंबंध ठेवत नाही, सारखा बाथरुममध्ये असतो, बायकोचा आरोप, मेडिकल फाईल तपासताच पायाखालची जमीन सरकली

    ‘हा तर प्रवाशांचा विश्वासघात’

    लोकलमध्ये अधिकृत फेरीवाले नेमण्याचा प्रस्ताव सर्वप्रथम सन २०२३ मध्ये मांडण्यात आला. तेव्हाही या योजनेला तीव्र विरोध झाला होता. तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकलमध्ये फेरीवाल्यांना मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू केली होती; मात्र प्रवासी संघटना आणि इतर समित्यांच्या आक्रमक विरोधानंतर रेल्वे प्रशासनाला माघार घ्यावी लागली होती. त्यावेळी भविष्यात लोकलमध्ये गर्दीत वाढ होणारे असे
    कोणतेही निर्णय घेण्यात येणार नसल्याचे तोंडी आश्वासन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते. आता पुन्हा कोणत्याही प्रवासी संघटना किंवा रेल्वे समिती सदस्यांना विश्वासात न घेता फेरीवाल्यांना मान्यता देणे हा प्रवाशांचा विश्वासघात असल्याचे सांगत उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्ष लता अरगडे आणि सरचिटणीस जीतू विशे यांनी हा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी मध्य रेल्वेकडे केली आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा