कुणाल कामरा याला आज विधान भवनात हक्कभंग समितीसमोर पार पडलेल्या सुनावणीवेळी समितीने एक महत्त्वाचा प्रस्ताव दिला. या प्रकरणात माफी किंवा दिलगिरी मागितली तर समिती वेगळ्या प्रकारे विचार करेल, असा प्रस्ताव देण्यात आला. त्याला आता कुणाल कामरा याने उत्तर दिलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल विडंबनात्मक गीत गायल्या प्रकरणी गुरुवारी (9 एप्रिल) विधान भवनात हक्कभंग समितीच्या समोर सुनावणी पार पडली. या सुनावणीसाठी कॉमेडियन कुणाल कामरा हा विधान भवनात दाखल झाला होता. गेल्या महिन्यात तक्रारदार भाजप नेते प्रवीण दरेकर गैरहजर राहिल्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी या प्रकरणी सुनावणी पार पडली. कुणाल कामरा आपल्या दोन वकिलांसह या सुनावणीला हजर होता. यावेळी कुणाल कामरा याची उलट तपासणी घेण्यात आली. हक्कभंग समितीचे प्रमुख आमदार प्रसाद लाड यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर प्रसाद लाड यांनी सुनावणीवेळी नेमकं काय घडलं? या विषयी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या आजारी असल्याने सुनावणीला हजर राहू शकल्या नाहीत.
प्रसाद लाड काय म्हणाले?
“कुणाल कामरा यांची आज तिसरी की चौथी सुनावणी होती. त्यांचा जबाब आज रेकॉर्डवर घ्यायचा होता. आमदार प्रवीण दरेकर यांनी त्यांच्या विरोधात तक्रार दिली होती. त्या तक्रार प्रकरणी आज तक्रारदार प्रवीण दरेकर आणि कुणाल कामरा दोघांचे जबाब नोंदवण्यात आले. दोघांना आज प्रश्न विचारण्यात आले. कुणाल कामरा यांना 24 प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये त्यांनी ज्या चुका केल्या आहेत त्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला, संविधानातून मिळालेल्या अधिकाराबाबत प्रश्न विचारण्यात आला. हक्कभंग समितीच्या अधिकाराबाबत त्यांना विचारण्यात आलं. त्यांनी सर्व प्रश्नांचं उत्तर दिलं”, असं प्रसाद लाड यांनी सांगितलं.”आम्ही त्यांना हे सुद्धा सांगितलं की, त्यांनी बिनशर्त दिलगिरी व्यक्त केली किंवा माफी मागितली तर त्याबाबत समिती वेगळ्या प्रकारे विचार करेल. तर त्यांच्या वकिलांनी सांगितलं की, ते या विषयावर कुमाल कामरा याच्यासोबत चर्चा करुन समितीला ई-मेल द्वारे माहिती पाठवतील”, अशी प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी सुनावणीनंतर दिली.
कुणाल कामरा काय म्हणाला?
कुणाल कामरा यांने प्रसाद लाड यांचा व्हिडीओ शेअर करत याबाबत प्रत्युत्तर दिलं आहे. “आदरणीय सर, कदाचित आपल्या संवादात काही अडचण आली असेल, पण आज संध्याकाळच्या माझ्या उलटतपासणीतील शेवटच्या 3 प्रश्नांचे उत्तर मला आठवतात त्यानुसार…”, असं म्हणत कुणाल कामरा याने आपल्या उलट तपासणीत विचारण्यात आलेले प्रश्न आणि त्याला दिलेलं उत्तर सांगितलं.
“प्रश्न 1-तुम्हाला तुमच्या कृत्याचा पश्चात्ताप वाटतो का? उत्तर: नाही. प्रश्न 2. तुम्ही जे काही बोललात, त्याबद्दल तुम्ही दिलगीर आहात का? उत्तर : नाही. प्रश्न 3. जर तुम्ही बिनशर्त माफी मागितली, तर या प्रकरणाकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिले जाईल. उत्तर: नाही, मी माफी मागू शकत नाही कारण ती माफी मनापासून किंवा प्रामाणिक नसेल. शिवाय, अशी माफी मागितल्याने इतर कलाकार आणि त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी एक चुकीचा पायंडा पडेल”, अशी भूमिका कुणाल कामरा याने ट्विट करत मांडली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात हक्कभंग समिती काय निर्णय घेते ते पाहणं महत्त्वाचं आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा