छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याला आज वणव्याने विळखा घातला. या वण्यात रायगड किल्ल्यावरील विद्यूत आणि जल वाहिन्या नष्ट झाल्या आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमुलकुमार जैन, रायगड : ऐन उन्हाळ्यात उष्णतेची तीव्रता वाढत असताना वन खात्याच्या राखीव वनक्षेत्रात तसेच खाजगी जागांमध्ये देखील वणवे लागून वनसंपत्ती नष्ट होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. असं असतानाच गुरुवारी (9 एप्रिल) छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडाला देखील लागलेल्या वणव्यामुळे रायगड किल्ल्यावर पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या तसेच विद्युत केबल देखील अनेक ठिकाणी जळून नष्ट झाल्या आहेत. मात्र सर्व काही नष्ट झाल्यानंतरच वन खात्याचे अधिकारी वणवा विझवण्यासाठी रायगड किल्ल्यावर दाखल झाले.
रायगड जिल्ह्यातील सर्व डोंगर माथ्यांवर जानेवारी महिन्यापासूनच वणवे लागण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. आत्तापर्यंत सर्वच डोंगर माथ्यावरील वनसंपदा जळून नष्ट झाली आहे. असाच प्रकार आज छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर दुपारच्या सुमारास घडला. अज्ञात व्यक्तीने लावलेल्या वणव्यामुळे किल्ले रायगडावर पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या या प्लॅस्टिकच्या होत्या, त्या जमिनी खाली एक ते दीड फूट खोदून जमिनीत पुरणे आवश्यक असताना देखील ठेकेदाराने त्या उघड्यावर ठेवल्याने आज वणव्याच्या भक्षस्थानी पडल्या. त्याच पद्धतीने विद्युत केबल देखील उघड्यावर ठेवल्याने त्या देखील काही ठिकाणी आगीच्या भक्षस्थानी पडल्याचे पाहण्यास मिळाले.
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या ऐतिहासिक किल्ले रायगडावर कामे करताना रायगड प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी, लक्ष देऊन काम केले असते तर पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या आणि विद्युत पुरवठा करणाऱ्या विद्युत केबल या जमिनीत टाकल्या असत्या, तर आज किल्ल्यावर लागलेल्या वणव्याचा विळख्यात पडल्या नसत्या. एकंदरीत रायगड प्राधिकरणाचे काम आंदळ दळते, कुत्र पीठ खातंय, या पद्धतीचे असल्याची प्रतिक्रिया पर्यटक आणि शिवभक्तांकडून देण्यात येत आहे.
हिरकणी वाडी पासून महादरवाजापर्यंत वणवा
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर हिरकणी वाडीपासून लागलेला वणवा हा वाऱ्याच्या वेगाने थेट महादरवाजापर्यंत गेल्याने पायरी मार्गावरून जाणारी विद्युत वाहिन्या आणि पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या देखील आगीच्या भक्षस्थानी पडल्या.
टकमक टोक मात्र वाचले!
किल्ले रायगडावर लागलेला आगीचा वणवा हा केवळ टकमक टोकापर्यंत गेला नाही. त्यामुळे त्या बाजूचा भाग हा आगीच्या भक्षस्थानी पडला नाही. मात्र किल्ल्याच्या हिरकणी वाडीकडील बाजूचा भाग पूर्ण जळून नष्ट झाला आहे.
आग एकीकडे तर वन खाते दुसरीकडे
किल्ले रायगडावर लागलेली आग ही हिरकणी वाडीपासून महादरवाजापर्यंत लागली असताना वन खात्याचे अधिकारी मात्र रायगड रोपवे ने गेल्याचे अनेक पर्यटकांनी आणि शिवभक्तांनी सांगितले. मात्र पायरी मार्गावरून गेले असते तर कदाचित पायरी मार्गावरून जाणारी विद्युत वाहिन्या आणि पाणी पुरवठ्याच्या जलवाहिन्या या आगीच्या भक्षस्थानी पडल्या नसत्या, अशी प्रतिक्रिया पर्यटक आणि शिवभक्तांनी दिली.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा