• Sat. Jun 6th, 2026
    Chhatrapati Sambhajinagar Crime : जातीवरुन छळ, मानसिक त्रास; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एसटी कर्मचाऱ्याचं टोकाचं पाऊल, एसटी महामंडळात खळबळ

    Chhatrapati Sambhajinagar News: वरिष्ठांच्या जाचाला आणि जातीवाचक शिवीगाळीला कंटाळून सिल्लोड आगारातील एसटी कर्मचारी शरद भिवसने यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमुळे एसटी महामंडळात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी डेपो मॅनेजरसह तिघांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: वरिष्ठ अधिकारी सतत छळ करतात, जातीवाचक शिवीगाळ करून मानसिक त्रास देतात,अशी हृदयद्रावक सुसाईड नोट लिहून एसटी महामंडळाच्या एका सहाय्यक वाहतूक निरीक्षकाने विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे सिल्लोड आगारासह संपूर्ण एसटी महामंडळात खळबळ उडाली असून, संतप्त कर्मचाऱ्यांनी काही काळ बस सेवा रोखून धरली होती.

    आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली

    शरद विठ्ठल भिवसने वय ४०, रा. वैशाली नगर, सिल्लोड असे या मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर डेपो मॅनेजर विजय काळवणे, वाहतूक निरीक्षक किरण अवसरमल, लिपिक विकास चव्हाण असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान या प्रकरणी अधिक माहिती अशी की, शरद भिवसने हे सिल्लोड आगारात कार्यरत होते. बुधवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे कामावर हजर झाले. मात्र, वरिष्ठांच्या जाचाला कंटाळलेल्या शरद यांनी दुपारी २ वाजेच्या सुमारास आर.एल. पार्क परिसरातील एका विहिरीत उडी घेतली. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत आपल्या मृत्यूला जबाबदार असलेल्या वरिष्ठांची नावे नमूद केल्याची माहिती समोर आली आहे.

    डेपो मॅनेजरसह तिघांवर गुन्हा

    घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि सहकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला होता. अखेर पोलिसांनी तक्रारीची दखल घेऊन तिघांविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त करणे आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

    Maharashtra TimesSindhudurg News : स्पोर्ट्स बाईक आणि स्विफ्ट कारची जोरदार धडक; मित्रांसोबत मालवण फिरायला गेलेल्या ओंकारचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    वारंवार दिला जात होता त्रास…..

    मिळालेल्या माहितीनुसार, शरद भिवसने यांना हे तिन्ही अधिकारी गेल्या अनेक दिवसांपासून विनाकारण मानसिक त्रास देत होते. त्यांना जातीवाचक शब्दांत बोलणे, अपमानित करणे आणि मुद्दाम बाहेरची ड्युटी लावण्याच्या धमक्या देणे, असे प्रकार सुरू होते. या सततच्या छळाला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलीस तक्रारीत म्हटले आहे.

    या घटनेचा निषेध म्हणून एसटी कर्मचाऱ्यांनी बस सेवा बंद पाडली. अचानक बस फेऱ्या रद्द झाल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली. सुमारे २० बस फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. गुन्हा दाखल झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले असले, तरी कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासनाविरुद्ध मोठा रोष कायम आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा