• Sat. Jun 6th, 2026

    Pune Crime: पुण्यात IT क्षेत्रातील तरुण-तरुणीसोबत भयंकर प्रकार; देहव्यापाराच्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवत पोलिसांनीच उकळले पैसे

    Pune Crime: पुण्यात IT क्षेत्रातील तरुण-तरुणीसोबत भयंकर प्रकार; देहव्यापाराच्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवत पोलिसांनीच उकळले पैसे

    Pune Police News: एका २४ वर्षीय तरुणाला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. मात्र, पुढे कायदेशीर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनीच दबाव टाकण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे.

    वाघोली ठाण्यातील तीन पोलिस निलंबित(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : आयटी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या तरुण-तरुणीला मध्यरात्री पोलिस ठाण्यात नेऊन कारवाई करण्याची भीती दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळल्याच्या गंभीर प्रकार वाघोली पोलिस ठाण्यात घडला. पैसे उकळणाऱ्या तीन पोलिस अंमलदारांवर निलंबनाची कठोर कारवाई करण्यात आली आहे.

    पोलिस हवालदार किरण अब्दागिरे, शिपाई गणेश खाडे आणि किरण कांबळे अशी निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. परिमंडळ सातचे पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी या कारवाईचा आदेश दिला.

    दोन एप्रिलच्या रात्री वाघोलीतील एका सोसायटीत संशयास्पद हालचालींची माहिती नियंत्रण कक्षाकडून (डायल ११२) वाघोली पोलिसांना देण्यात आली होती. त्यानुसार बीटमार्शल गणेश खाडे आणि किरण कांबळे घटनास्थळी पोहोचले. तेथून त्यांनी एका २४वर्षीय तरुणाला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. त्या वेळी ठाणे अंमलदार म्हणून अब्दागिरे ड्युटीवर होते. घटनेची शहानिशा करून कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित असताना, संबंधित पोलिसांनी ‘सेक्स रॅकेटमध्ये गुंतवू, नोकरी घालवू, नातेवाइकांना बोलावू,’ अशी भीती तरुण-तरुणीला दाखवली. त्यानंतर खाडे यांनी तरुणाला मारहाण केली, तर कांबळे यांनी तरुणीला ठाण्यात उभे ठेवून मानसिक त्रास दिला. प्रकरण मिटवण्यासाठी तिघांनी दहा हजार रुपयांची मागणी केली आणि ती रक्कम ऑनलाइन पद्धतीने स्वीकारल्याचे उघड झाले. ही रक्कम एका ‘ओंकार ऑटो गॅरेज’ नावाच्या स्कॅनरद्वारे घेतल्याचेही समोर आले आहे.

    घटनेबाबत संशय आल्याने संबंधित तरुणाने सखोल चौकशी केली असता, हा प्रकार केवळ पैसे उकळण्यासाठी रचल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पीडित तरुण-तरुणीने पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे तक्रार दाखल केली. प्राथमिक चौकशीत आरोपांमध्ये तथ्य आढळून आल्याने आयुक्तांनी तातडीने निलंबनाचा आदेश दिला.

    दरम्यान, “पोलिस दलात शिस्तभंग किंवा अधिकाराचा गैरवापर सहन केला जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल,” असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा