• Fri. Jul 3rd, 2026

    युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका

    ByMH LIVE NEWS

    Apr 9, 2026
    युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका

    इराण आणि अमेरिका युद्ध कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद व्हावे, अशी जगाची इच्छा होती. थेटपणे जगाला या युद्धाचा फटका बसला. दोन आठवड्यांकरिता इराण आण अमेरिकेने युद्धबंदीची घोषणा केली. त्यानंतर इराणने होर्मुज खाडी सुरू केली. पण त्यानंतर इस्त्रायलने लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यानंतर स्थिती पुन्हा भयंकर झाली. पुन्हा होर्मुज खाडी बंद झाली. होर्मुज खाडी बंद असल्याने पुन्हा जग संकटात आले. इराणसोबतच्या युद्धात अमेरिका एकटी पडताना दिसली. होर्मुज खाडी खुली करण्याकरिता अमेरिकेने स्वत:च्या तोंडाने काही देशांचे नाव घेत होर्मुजमध्ये मदत मागितली होती. पण एकही देश अमेरिकेच्या मदतीला पुढे आला नसल्याचे बघायला मिळाले. शेवटी अमेरिकेने थोड्या काळासाठी युद्धातून माघार घेतली. अमेरिका आणि इराणमध्ये पाकिस्तानमध्ये युद्धबंदी कराराकरिता बैठक ठेवण्यात आली. दोन्ही देशांमध्ये लवकरच युद्धबंदी करार होईल सांगितले जात आहे.

    डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात अमेरिकेत संताप बघायला मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणकडून एक छोटीशी गोष्ट हिसकावून घेतली. नोबेल शांतता पुरस्कार न मिळाल्याने ट्रम्प प्रचंड संतापले होते. व्हेनेझुएलामधील सहजतेमुळे त्यांना आणखीच प्रोत्साहन मिळाले. त्यानंतर त्यांनी थेट इराणवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला आणि तिथेच ते फसले.

    अमेरिकेला इराणसोबतच्या युद्धात ओढण्याची वाट गेल्या 40 वर्षांपासून इस्त्रायल बघत होते. इस्त्रायलला देखील माहिती होते की, आपण एकटे कधीच इराणसोबत लढू शकत नाहीत. अमेरिकेने साथ दिली तर हे शक्य आहे. अमेरिकेने साथ दिली पण इराणने ज्या पद्धतीने युद्धात उत्तर दिले, त्याचा विचार कदाचित जगातील एकही देशाने केला नसावा.

    इराण दोन ते तीन आठवड्यांत अणुबॉम्ब बनवून इस्रायलवर टाकेल, याची ट्रम्प यांना जाणीव करून देण्यात आली. मात्र, इराणसोबतचे युद्ध अमेरिकेला भारी पडल्याचे बघायला मिळत आहे. अमेरिकेचे युद्धात नुकसान झाले. डोनाल्ड ट्रम्प यांना वाटते होते की, इराणला 4 आठवड्यांमध्ये आपण हारू शकतो. पण प्रत्यक्षात आपला डाव आपल्यावरच उलटा पडताना डोनाल्ड ट्रम्प यांना दिसला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed