Beed Crime: डॉक्टरांनी महेश गेल्याचे सांगतच त्याच्या कुटुंबावर जणू आभाळ कोसळले. क्षणभर त्यांना काहीच सुचले नाही. घरातला लाडका महेश आता त्यांच्यात कधीच येणार नाही या विचाराने कुटुंबीय सुन्न झाले.
मित्रासोबतचा वाद, वाढदिवसाचं सेलीब्रेशन निमित्त ठरलं; व्हॉट्सअॅप स्टेटसमधून मनातलं सांगितलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुकेशनी नाईकवाडे, बीड : बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यात एका २४ वर्षीय तरुणाने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली आहे. कुंबेफळ या गावाचा रहिवाशी असलेल्या युवकाने मित्रांसोबत झालेल्या वादानंतर, वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला बोलावले नसल्याच्या क्षुल्लक कारणातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. महेश उद्धव भणगे असं मृत तरुणाचे नाव आहे.
या प्रकरणी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महेशने काल सायंकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरात विषारी औषध प्राशन केलं आणि तो घराच्या छतावर एकटाच झोपायला गेला. बराच वेळ झाला तरी महेश खाली का आला नाही, हे पाहण्यासाठी कुटुंबातील सदस्य रात्री ८ वाजेच्या सुमारास छतावर गेले असता महेश बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्यानंतर त्याने पाणी पिण्याच्या तांब्यात काहीतरी विषारी द्रव्य मिसळून प्यायले असल्याचे त्यांना समजले. कुटुंबीयांनी त्याला तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात हलवलं. मात्र उपचारापूर्वीच महेशचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगून त्याला मृत घोषित केले.
नेमकं काय घडलं?
महेश आणि त्याच्या मित्राचा काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. दोन दिवसांपूर्वी म्हणजेच सोमवारी त्याच्या एका मित्राचा वाढदिवस होता. नेहमी मित्रांच्या कामात आणि वाढदिवसाच्या नियोजनात तो पुढाकार घ्यायचा. मात्र पहिल्यांदाच असे झाले की महेशला यावेळेस मित्रांनी बोलावले नाही. त्याला सोडून सर्वांनी वाढदिवस साजरा केला. यामुळे तो नैराश्यात गेला होता, असं सांगण्यात आले आहे. महेशने आत्महत्येपूर्वी काल मंगळवारी दुपारी त्याच्या मोबाईलरील व्हॉट्सअॅपवर “माझं दुःख कोणाला सांगू, मी एकटा पडलो” असे भावनिक स्टेटस ठेवले होते. या स्टेटसवरून त्याला आलेला एकटेपणा आणि नैराश्य झाल्याचे दिसून येत होते. याच कारणावरून महेशने कोणाचाही विचार न करता मृत्यूला कवटाळले.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा