• Thu. Jun 18th, 2026

    Mumbai Pod Taxi: मुंबईत धावणार ‘ड्रायव्हरलेस पॉड टॅक्सी’, पहिल्या टप्प्यात कुर्ला-वांद्रे 3 किमी मार्ग; दर 30 सेकंदांनी सेवा

    Mumbai Pod Taxi: मुंबईत धावणार ‘ड्रायव्हरलेस पॉड टॅक्सी’, पहिल्या टप्प्यात कुर्ला-वांद्रे 3 किमी मार्ग; दर 30 सेकंदांनी सेवा

    Pod Taxi Route: मुंबईत मंगळवारी बीकेसी येथे पॉड टॅक्सीचं भूमिपूजन होणार आहे. यामुळे मुंबईतील प्रवास वाहतूककोंडीमुक्त आणि आधुनिक होणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: शहरातील प्रवास आधुनिक करण्याच्या दिशेने महत्त्वाची पावले उचलली जात आहेत. मुंबईत मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पॉड टॅक्सी प्रकल्पाचं भूमिपूजन होणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुलात हे पार पडणार असून शहारातील सर्वात दाट लोकवस्ती असेलेल्या परिसरांमध्ये ही टॅक्सी धावणार आहे. लवकरच ही टॅक्सी शहरात सुरू होणार असून प्रवास जलद व आरामदायी होण्याची अपेक्षा आहे.

    कसा असेल मार्ग?

    शहरातील कुर्ला आणि वांद्रे पूर्वदरम्यान पहिल्या टप्प्यात पॉड टॅक्सीची सुरुवात होणार आहे. या भागात 3.36 किमी मार्गावर ही टॅक्सी धावेल. या मार्गावर एकूण 8 स्थानकं असतील. वांद्रे पूर्व, कलानगर,एमएमआरडीए जुनी इमारत, एक्साईझ डिपार्टमेंट, भारत डायमंड बोर्स गेट 11, एमएमआरडीए पे अँड पार्क, एलबीएस मार्ग आणि कुर्ला या स्थानकांवर थांबे असतील. वांद्रे-कुर्ला संकुलात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना या टॅक्सीचा मोठा फायदा होणार आहे.Maharashtra TimesMumbai Metro: ठाणे, हार्बर लाइनवर पहिल्यांदाच मेट्रो धावणार! ‘मेट्रो 9 आणि 2बी’चं लोकार्पण; थेट अंधेरी ते मिरा-भाईंदर प्रवास

    2031 पर्यंत पॉड टॅक्सीच्या मार्गाचा 8.85 किमीपर्यंत विस्तार करण्याची योजना आहे. या मार्गावर 22 स्थानकं असतील. यापूर्वी 38 स्थानकांचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. पण नंतर त्यांची संख्या कमी करून ती 22 करण्यात आली. दरम्यान, बीकेसीमध्ये पॉड टॅक्सीच्या मार्गाचा पुढे वर्तुळाकर लूप वाढवून विस्तार केला जाणार आहे. पॉड टॅक्सी फक्त या ठराविक स्थानकांवरच थांबणार असून या लूपच्या मदतीने नागरिक आपला मार्ग निवडू शकतात. त्यामुळे प्रवासात वेळ वाचणार आहे.

    काय असतील वैशिष्ट्ये?

    या मार्गावर प्रत्येक 200 मीटर अंतरावर वातानुकूलित स्थानकं असतील. प्रत्येक पॉड टॅक्सीमध्ये एका वेळी सहा प्रवासी प्रवास करू शकतील. ताशी 40 किमी वेगाने ही टॅक्सी धावणार आहे. 2031पर्यंत 1.09 लाख प्रवासी प्रवास करतील. 2022मधील अंदाजानुसार प्रत्येक किलोमीटरवर 21 रुपये भाडं असण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी 1,016 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून 2027पर्यंत ही टॅक्सी मुंबईतील मार्गांवर धावणार आहे.

    Maharashtra TimesMumbai-Vijaydurg Ro-Ro Ferry: मुंबईकडे परतताना फेरीत तांत्रिक बिघाड, ‘विजयदुर्ग रो-रो’ तात्पुरती बंद; जहाजाचे तीन इंजिन निकामी

    ही पॉड टॅक्सी पूर्णपणे ड्रायव्हरलेस असून 8 मीटर उंच खांबांच्या आधारे 8 इंच रुंदीच्या एलिव्हेटेड ट्रॅकवरून धावेल. या टॅक्सीची लांबी 3.5 मीटर असून रुंदी 1.47 मीटर आणि उंची फक्त 1.8 मीटर असेल. यामुळे पॉड टॅक्सीने मुंबईच्या वाहतूककोंडीतून प्रवास करणं सोपं होणार आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा