• Tue. Jun 16th, 2026

    Maharashtra Weather: ढग परतले! अवकाळीनंतर महाराष्ट्राला दिलासा, दिवसभर कोरडं वातावरण; केवळ विदर्भात ‘यलो अलर्ट’

    Maharashtra Weather: ढग परतले! अवकाळीनंतर महाराष्ट्राला दिलासा, दिवसभर कोरडं वातावरण; केवळ विदर्भात ‘यलो अलर्ट’

    Maharashtra Weather Alert 7 April: भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्राला अखेर दिलासा मिळणार असल्याची माहिती दिली आहे. अरबी समुद्रातील कमी दबाच्या पट्ट्यामुळे तयार झालेल्या ढगांमुळे राज्यात अवकाळी पावसाचं संकट निर्माण झालं होतं. पण हेच ढग हळूहळू पुढे सरकरत असून वातावरण स्थिर होण्याची शक्यता आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: गेले काही दिवस अवकाळी पावसानं जिल्ह्याला झोडपलं असताना नागरिकांना आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत अनेक भागांत ढगाळ वातावरण असलं तरी पावसाची शक्यता कमी आहे. विदर्भातील काही भागांत फक्त हलक्या सरींचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळ, 7 एप्रिल रोजी, मंगळवारी राज्यात हवामान प्रामुख्याने कोरडं राहण्याची शक्यता आहे.

    कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?

    हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील काही जिल्ह्यात अजूनही अवकाळी पावसाचं संकट कायम आहे. त्यामुळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना 7 एप्रिल रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. यावेळी वादळी वाऱ्यांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. राज्यातील उर्वरित भागांत वातावरण कोरडं राहील. दरम्यान, धुळे, नंदूरबार, नाशिक आणि नाशिकधील घाट परिसरातही हलक्या सरींची शक्यता आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघरमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण असेल. यामुळे उन्हाचा तडाखा कमी जाणवण्याची शक्यता आहे.Maharashtra TimesPune Weather: मान्सूनपूर्वीच पुण्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ, अवकाळीमुळे हवामान बदललं; 2016नंतर एप्रिलमधील नीचांकी तापमानाची नोंद

    याउलट, काही जिल्ह्यातील तापमान पुन्हा वाढायला सुरूवात झाली आहे. नागपूर, अमरावती, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. या भागांमध्ये आज किमान तापमान 24 ते 27 अंश सेल्सिअस दरम्यान असण्याची शक्यता आहे. तसेच, कमाल तापमानाचा पारा 38 ते 42 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्यची शक्यता आहे. या ऊन-पावसाच्या सततच्या खेळामुळे राज्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

    कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील हवामान

    कोकण किनारपट्टीनर हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 24 ते 26 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 32 ते 35 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्येही पावासाची शक्यता कमी आहे. कमाल तपामान 34 ते 38 अंश सेल्सिअस दरम्यान राहील.

    Maharashtra TimesMumbai Local: आता 15 डब्यांची लोकल डहाणूपर्यंत! विरार-डहाणू चौपदरीकरणाला वेग; महिनाअखेर सेवा सुरू

    मराठवाड्यात उष्णतेची लाट

    दरम्यान, मराठवाड्यातही उष्णतेची लाट पुन्हा येण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये 7 एप्रिल रोजी तापमान 36 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तसेच, काही भागांत तापमान सातत्याने 40 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा