• Sat. Jun 6th, 2026

    Nanded Crime : मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडताच शिवसेना नेत्याला संपवलं; तीन वर्षांपूर्वीही झाला होता जीवघेणा हल्ला, नांदेडमध्ये खळबळ

    Nanded Crime : मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडताच शिवसेना नेत्याला संपवलं; तीन वर्षांपूर्वीही झाला होता जीवघेणा हल्ला, नांदेडमध्ये खळबळ

    Nanded Crime News : नांदेडमध्ये शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते सोनू कल्याणकर यांची भररस्त्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या करण्यात आली. शहरात गेल्या ३ दिवसांत ५ खून झाल्याने भीतीचे वातावरण असून गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

    सोनु कल्याणकर यांच्यावर श्रीनगर भागात जीवघेणा हल्ला, नांदेडमध्ये तीन दिवसात पाच जणांचा खून(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अर्जुन राठोड, नांदेड : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या एका कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. सोमवारी पहाटे साडे पाच वाजेच्या सुमारास श्रीनगर परिसरात ही घटना घडली. या हल्ल्यात कार्यकर्ताचा जागीच मृत्यू झाला. सोनु कल्याणकर (वय 35) अस नाव असून तीन वर्षापूर्वी त्याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. तीन दिवसात हा पाचवा खून असून खुनाच्या घटनेने नांदेड शहर हादरलं आहे.

    सोनू कल्याणकर याचे घटनास्थळ पासून काही अंतरावर घर आहे. नियमित पणे तो मॉर्निंगवॉकसाठी जायचा. आज देखील सकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडला. श्रीनगर मार्गांवरून जातं असताना तीन ते चार जणांनी त्याला घेरले आणि तीक्ष्ण हत्याराने पोटात आणि पाठीत वार करून फरार झाले. रक्तबंभाळ झालेल्या कल्याणकर याचा जागीच मृत्यू झाला. घटनेने एकच खळबळ उडाली. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस हल्लेखोरांचा शोध सुरु केला आहे. या घटनेने मात्र खळबळ उडाली आहे.

    तीन वर्षापूर्वी झाला होता गोळीबार

    विशेष म्हणजे सोनु कल्याणकर याचा तीन वर्षांपूर्वी जीव घेणा हल्ला झाला होता. रींदा गँगचा सदस्य गोलू मंगनाळे याने त्याच्यावर गोळीबार केला होता, त्यात तो बचावला. गोळीबार करणारा गोल मंगनाळे सद्या तुरुंगात आहे. यामागे त्याचा हात आहे का याचा तपास पोलीस करीत आहे. सोनू कल्याणकर हा तरुण राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय होता. काही दिवसापूर्वी त्याने भाजप सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता.

    Maharashtra TimesRohit Pawar : ‘अजितदादाच निवडणूक लढवत आहेत असं समजा’; सुनेत्रा काकींसाठी रोहित पवारांचं बारामतीकरांना भावनिक आवाहन

    तीन दिवसात पाच जणांचा खून

    नांदेडमध्ये सद्या खुनाची मालिका सुरु आहे. मागील तीन दिवसात पाच जणांचा खून झाला आहे. दोन दिवसापूर्वी भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिहेरी हत्याकांड घडलं. वर्चस्वाच्या वादातुन सदा गँग आणि साई लाला गँगच्या सदस्यामध्ये राडा जाला होता. यात अर्जितसिंह चव्हाण, मोहम्मद अरबाज आणि सय्यद आवेज याचा खून झाला, त्यानंतर वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुरमुरा गल्ली येथे रज्जुसिंघ तबेलेवाले याचा खून करण्यात आला.

    आज सकाळीं सोनू कल्याणकर या तरुणाचा खून करण्यात आला. तीन दिवसात पाच खूनाची घटना घडल्याने कायदा आणि सुवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा