बारामती पोटनिवडणुकीवरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. “काँग्रेसने निवडणूक लढवू नये, अन्यथा मोठा पराभव करू,” असा इशारा देत त्यांनी सुनेत्रा पवारांना ७५ टक्के मताधिक्य मिळेल असंही म्हटलं आहे.
काँग्रेसला तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असा पराभव करु; बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार दिल्याने भाजपचा इशारा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्नेहल निमगिरे, पुणे : बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधत आक्रमक भूमिका मांडली. “बारामतीत काँग्रेसने निवडणूक लढवू नये. जर लढलीच तर त्यांचा असा पराभव करू की त्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही,” असा थेट इशारा त्यांनी काँग्रेसला दिला आहे. बावनकुळे यांनी अजित पवार यांच्या राजकीय प्रवासाचा संदर्भ देत काँग्रेसला भावनिक साद घातली. “अजित दादांचा बहुतांश राजकीय काळ काँग्रेससोबत गेला आहे. त्यांचे संबंध, सहवास आणि कामाचा इतिहास काँग्रेसशी जोडलेला आहे. त्यामुळे काँग्रेसने काही राजकीय संस्कार जपायचे असतील, तर त्यांनी बारामतीत निवडणूक लढवू नये आणि सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी उभं राहावं,” असं ते म्हणाले.
बारामतीतील विजयाबाबत दावा
बारामतीतील विजयाबाबत त्यांनी मोठा दावा केला. “आम्ही स्वतः बारामतीत जाऊन सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज भरू. बारामतीत ७५ टक्क्यांहून अधिक मतांनी विजय मिळवू. काँग्रेसचा आजवर कधीच झाला नसेल इतका मोठा पराभव येथे होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी”
शरद पवार यांच्या भूमिकेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. मात्र भाजपची भूमिका अगदी ठाम आहे. बारामतीत काँग्रेसने निवडणूक लढवू नये.”
Satara Accident : मोपेडवरुन शेतात निघालेल्या वृद्ध दाम्पत्याला भरधाव कारने चिरडलं, एकुलती एक लेक पोरकी झाली
“पक्षाचा विस्तार हे आमचे उद्दिष्ट”
दरम्यान, आज भाजपच्या वर्धापन दिनानिमित्त पक्ष संघटनाबाबतही त्यांनी महत्त्वाचे विधान केले. “पक्षाचा विस्तार आणि बळकटीकरण हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. पुण्यात आणि राज्यात, देशभरात भाजपचे संघटन ५१ टक्क्यांपेक्षा अधिक नेण्याचा संकल्प केला आहे. युवकांना मोठ्या प्रमाणावर पक्षाशी जोडणार आहोत. राज्यभर संघटना मजबूत करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
“दोषी अधिकाऱ्यांना बडतर्फ करु”
अशोक खरात प्रकरणावर त्यांनी सावध भूमिका घेतली. “हे प्रकरण संवेदनशील आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी माध्यमांसमोर यावर भाष्य करणं योग्य नाही. SIT कडून जे निष्कर्ष समोर येतील त्यानुसारच कारवाई होईल. जर अधिकारी दोषी आढळले, तर त्यांना बडतर्फ करण्यात येईल,” असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, अजित पवार यांच्या अपघातावर काँग्रेसकडून गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर त्यांनी पलटवार केला आहे, “निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अशा मागण्या केल्या जात आहेत. मात्र बारामतीतील जनता सुनेत्रा पवारांना प्रचंड मतांनी विजयी करेल आणि काँग्रेसला मोठा धक्का बसेल,” असा दावा बावनकुळे यांनी केला.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा