• Mon. Jun 15th, 2026

    ‘बॉडी पार्ट्सवर कॅमेरा झुम करणे हे प्रायव्हसीचे उल्लंघन’- जान्हवी कपूर 

    ByMH LIVE NEWS

    Apr 6, 2026
    ‘बॉडी पार्ट्सवर कॅमेरा झुम करणे हे प्रायव्हसीचे उल्लंघन’- जान्हवी कपूर 

    मुंबई – ललिता पिल्लेवार

    पापाराझ्झींकडून कोणाच्याही बॉडी पार्ट्सना झुम करुन फोटो काढण्याच्या पद्धतीवर अभिनेत्री जान्हवी कपूर हिने टीकास्र सोडले आहे. ती म्हणाली ड्रेस कसाही असो त्यांच्या परवानगी शिवाय बॉडी पार्ट्सना झुम करुन फोटो काढणे मर्यादेचे उल्लंघन असल्याचे तिने म्हटले आहे. अभिनेत्री जान्हवी कपूर म्हणाली की पॅप्स (paparazzi) त्यांच्या शरीराचे फोटो झूम करुन काढतात ते खाजगीपणाचे उल्लंघनच आहे. राज शमानी यांना दिलेल्या मुलाखतीत जान्हवी कपूर हीने ही भूमिका मांडली आहे.

    जान्हवी कपूर हीने सांगितले की काही दिवसापूर्वी तिने स्वत: पपाराझ्झीशी स्वतंत्र भेट घेऊन त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की त्यांचे काम कधी-कधी किती चुकीच्या दिशेने जात असते. जान्हवी हीने त्यांना सांगितले की ज्या प्रकारे तुम्ही महिलांचे फोटो काढता. ते केवळ आमच्यासाठी वाईट नसून तूमची स्वत:ची छबि देखील खराब करते. तिने फोटोग्राफर्सना आरसा दाखवत विचारले की केवळ काही पैशांसाठी वा जास्त व्यूजसाठी कोणा महिलेच्या शरीराचे तिच्या मर्जी शिवाय एका वस्तू सारखा वापर करुन तुम्हाला स्वत:च्या नजरेत इज्जत मिळते का ? जान्हवी हीच्या मतानुसार पॅप्सने तिचे म्हणणे गंभीरपणे ऐकले आणि आपली चूक कबूल केली.

    आपली गोष्ट आणखी क्लिअर करण्यासाठी जान्हवी हने तिच्या ‘भीगी साडी’ गाण्याचे उदाहरण दिले. ती म्हणाली की त्या गाण्यात तिने जाणूनबुजून एक सेंसुअल(Sensual) भूमिका स्वीकारली होती. कारण ती तिची पसंद आणि चित्रपटाची मागणी होती.

    तिने सांगितले की तिथे मी माझ्या मर्जीने ते काम केले होते. परंतू जेव्हा मी माझ्या खाजगी जीवनात बाहेर पडते, तेव्हा माझ्या पसंतीचे कपडे घालण्यासाठी स्वतंत्र आहे. याचा अर्थ हा अजिबात नाही की कोणीही कॅमेरा लावून माझ्या माहिती शिवाय माझ्या बॉडी पार्ट्स झुम करुन वा त्या व्हिडीओ स्लो मोशन आणि अजब म्युझिक टाकून त्यांना व्हायरल करावे. परवानगी शिवाय कोणालाही सेक्शुअलाइज करणे चुकीचे आहे.

    मला नाही म्हणण्याचा हक्क

    जान्हवी हीने केवळ रस्त्यातील पापाराझींवरच नव्हे तर फिल्मच्या सेटवर काम करण्याच्या पद्धतीवर देखील तिचे मत मांडले. तिने सांगितले की सहमतीचा अधिकार सर्वत्र असायला हवा. जर चित्रपटाच्या सेटवरही कॅमेरा कोणत्या अँगलने लावला जात असेल तर आणि ज्यामुळे मला असहजता वाटत असेल तर मला नकार देण्याचा पूर्ण अधिकार आहे. असे बोलण्याने मला ‘अनप्रोफेशनल’ ठरवणे योग्य नाही.तिने सांगितले की प्रत्येक पावलांवर विचारणे गरजेचे आहे की कलाकाराने कोणत्या गोष्टीसाठी सहमती दिली आहे आणि कुठे तिची प्रायव्हसीचे उल्लंघन होत आहे.

    मुलाखती दरम्यान जान्हवी हिच्या बोलण्यावरून हे स्पष्टपणे दिसून आले की, अशा प्रकारांमुळे ती खूप अस्वस्थ आहे. तिला विश्वास आहे की, विशिष्ट प्रकारे कपडे घातल्याने किंवा ग्लॅमरस दिसल्याने, कोणालाही तुमच्या परवानगी शिवाय तुमच्या शरीराला एका प्रोडक्ट प्रमाणे वागवण्याचा अधिकार मिळत नाही.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed