• Sat. Jun 6th, 2026

    Pune Crime: पुण्यात इन्स्टावरील प्रेमाचा भयंकर अंत, व्यावसायिकाने तरुणीवर गंभीर आरोप करत जीवन संपवलं; १२ पानी पत्राने नवे वळण

    Pune Crime: पुण्यात इन्स्टावरील प्रेमाचा भयंकर अंत, व्यावसायिकाने तरुणीवर गंभीर आरोप करत जीवन संपवलं; १२ पानी पत्राने नवे वळण

    Pune Love Affair: काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावरून सराफ व्यावसायिकाची एका तरुणीशी ओळख झाली. ही हळूहळू ओळख प्रेमसंबंधात बदलली आणि या नात्यात त्या तरुणीने लग्नाचे आश्वासन देत तरुणाचा विश्वास संपादन केल्याचे तपासात समोर आले आहे.

    पुण्यात इन्स्टावरील प्रेमाचा भंयकर अंत, व्यावसायिकाने तरुणीवर गंभीर आरोप करत जीवन संपवलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा धक्का सहन न झाल्याने सराफ व्यावसायिक तरुणाने दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना फुरसुंगी परिसरात घडली असून समाजमाध्यमातून संपर्कात आलेल्या तरुणीने संबंधित तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. संबंधित तरुणीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

    या प्रकरणी २९ वर्षीय तरुणाच्या वडिलांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही घटना सहा मार्च रोजी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाचे फुरसुंगी येथे सोन्या-चांदीचे दागिने विक्रीचे दुकान होते. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये ‘इन्स्टाग्राम’ या सोशल नेटवर्किंग साइटवरून त्याची आरोपी तरुणीशी ओळख झाली. तरुणाच्या प्रेमाचा गैरफायदा घेऊन आरोपी तरुणीने त्याच्याकडून ५० हजार रुपयांची सोन्याची अंगठी, महागडे ड्रेस आणि भेटवस्तू लाटल्या. मात्र, पुढे ती वारंवार भेट टाळू लागली आणि वेगवेगळी कारणे सांगत दूर राहू लागली. यामुळे तरुण मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाला होता.

    आरोपी तरुणीने आपल्याला कर्करोग झाल्याचे खोटे सांगून त्याची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. तरुणीने त्याला भेटणे टाळायला सुरू केल्यावर नैराश्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलले. ६ मार्च रोजी त्याने आपल्या दुकानात गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेनंतर पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, तपासादरम्यान त्याच्याकडून लिहिलेली सविस्तर सुसाईड नोट हाती लागली. या पत्रात त्याने आपल्या भावनिक त्रासाचा आणि विश्वासघाताचा उल्लेख केल्याची माहिती समोर आली आहे.

    दरम्यान, या आधारे पोलिसांनी संबंधित तरुणीविरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा