Otur Accident Woman Died : पुण्याच्या ओतूर येथील मोनिका चौकात ट्रक आणि स्कुटीचा भीषण अपघात झाला. या अपघातात २८ वर्षीय स्नेहल अहिनवे या महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ओतूरमधील मोनिका चौकात भीषण अपघात २८ वर्षीय महिलेचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्नेहल निमगिरे, पुणे : ओतूर परिसरातील मोनिका चौकात शुक्रवारी सकाळी काळजाचा थरकाप उडवणारा भीषण अपघात झाला. भरधाव ट्रक आणि स्कुटीमध्ये झालेल्या जोरदार धडकेत २८ वर्षीय स्नेहल रवींद्र अहिनवे या तरुण महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताचा अंगावर शहारे आणणारा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून, यात दुर्दैवाने ट्रकचे चाक स्नेहल यांच्या डोक्यावरून गेल्याचे दिसत आहे. या दुर्घटनेमुळे तिला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि गंभीर दुखापत झाली. या घटनेमुळे ओतूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
डॉक्टरांनी मृत घोषीत केले
स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत तिला जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तात्काळ तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे स्नेहलच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून, ओतूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी अपघाताची नोंद घेत तपास सुरू केला आहे. ट्रकचालकावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत. अपघाताचे कारण, जबाबदारी आणि नियमभंग यांचा शोध सुरू आहे.
हेल्मेटचा वापर महत्त्वाचा
सदर अपघातामुळे नागरिकांमध्ये रस्त्यावरील सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढली आहे. रहिवाशांनी सांगितले की वाहन चालवताना योग्य वेग राखणे, हेल्मेटचा वापर करणे आणि इतर वाहनांशी सुरक्षित अंतर ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.Hina Baloch Pakistan Gay Claim : ‘पाकिस्तानमधील 80 टक्के पुरुष ‘गे’ तर 20 टक्के बायसेक्शुअल’; ट्रान्सजेंडर ॲक्टिव्हिस्ट हिना बलोच यांचा दावा
सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
ओतूर परिसरातील रहिवाशांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आणि प्रशासनाकडून रस्त्यांवरील सुरक्षा वाढवण्याची मागणी केली. अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अनेकांना वाहन चालवताना अधिक सावध राहण्याची जाणीव झाली आहे.
निष्पाप महिलेचा जीव गेला
ही घटना रस्त्यांवरील अपघात किती गंभीर परिणाम करू शकतो याची आठवण करून देते. सध्या ट्रक चालकावर कारवाई करण्यात येत आहे मात्र या भीष्ण अपघातात एका महिलाला मात्र जीव गमवावा लागला आहे. पुढील तपासात काय गोष्टी समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा