• Fri. Jun 19th, 2026
    Thane Crime : धाड..धाड..धाड; मानलेल्या बहिणीला छेडलं, भावाच्या डोक्यात सणक गेली, मुंबईत बेछूट गोळीबार; एकाचा मृत्यू

    Mumbra Firing One Dead : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच मुंबईतील मुंब्र्यात एक मोठी घटना समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

    मुंब्रा बहिणीची छेड गोळीबार एक मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, ठाणे : ठाण्यातील मुंब्रा परिसर आज गुरुवारी एक मोठी घटना समोर आली आहे. भरदिवसा झालेल्या थरारक गोळीबाराने हादरला. कैलास नगर येथील कै. सुमनताई चव्हाण हिंदी प्राथमिक विद्यालयाजवळ आज सकाळी सुमारे ११.३० वाजता घडलेल्या या घटनेनं परिसरात भीतीचं सावट पसरलं आहे. छेडछाडीच्या वादातून संतापलेल्या आरोपीने चौघांवर बेछूट गोळीबार केल्यानं एकाचा मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

    नेमकी घटना काय?

    मिळालेल्या माहितीनुसार, जयन शिवानंदन नायर (वय ५१) याने त्याच्या मानलेल्या बहिणीशी संबंधित छेडछाडीच्या कारणावरून हा हल्ला केला. वाद चिघळताच संतापाच्या भरात त्याने अब्दुल हसन शेख, अकबर अब्दुल शेख आणि समीर अहमद शेख यांच्यावर भररस्त्यात गोळ्यांचा वर्षाव केला. या भीषण घटनेत अकबर शेख यांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने काळसेकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
    Maharashtra TimesKarul Ghat Accident : सिमेंटने भरलेला भरधाव ट्रक दरीत कोसळला, भीषण अपघाताने कुटुंबावर दु:खाचा डोंगर; बाप-लेकाचा करुण अंत

    आरोपी शस्ज्ञासह ताब्यात

    दरम्यान, या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शाळेजवळच ही घटना घडल्यानं पालक आणि स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. गोळीबारानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र, मुंब्रा पोलिसांनी तात्काळ हालचाल करत काही वेळातच त्याला गुन्ह्यात वापरलेल्या शस्त्रासह ताब्यात घेतलं. पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे मुंब्र्यात कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असून, भरदिवसा अशा प्रकारे गोळीबार होणं ही चिंतेची बाब असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मुंब्रा पोलीस करत आहेत.
    Maharashtra TimesPune Crime : नाईट ड्युटीला गेलेल्या आजीची नात अज्ञाताने संपवली; लाडक्या नातीसाठी धडपडणाऱ्या आजीवर आभाळ कोसळलं, आळंदीत भयानक घटना

    रील्स स्टार सुरेंद्र पाटीलला पुन्हा अटक

    दोन दिवसांपूर्वी ठाण्यातील डोंबिवली येथे एक मोठा प्रकार उघडकीस आला आहे. सोशल मीडियावर ‘गँगस्टर स्टाईल’ व्हिडिओमुळे प्रसिद्ध असलेला ‘रील स्टार’ सुरेंद्र पांडुरंग पाटील याला पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे. ५५ वर्षीय पाटील हा बिल्डर असून त्याच्यावर यापूर्वीही बलात्कारासह इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच तो एका प्रकरणात जामिनावर बाहेर आला होता. मात्र, अवघ्या दोन आठवड्यांतच त्याला पुन्हा अटक करण्यात आली आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा