• Wed. Jun 17th, 2026

    Dombivli Crime : सांस्कृतिक डोंबिवली शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न, 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार, चिमुकलीचाही विनयभंग

    Dombivli Crime : सांस्कृतिक डोंबिवली शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न, 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार, चिमुकलीचाही विनयभंग

    डोंबिवली हादरली, ५ वर्षांच्या चिमुरडीवर विनयभंग आणि एका २२ वर्षीय महिलेवर अत्याचाराची घृणास्पद घटना समोर आली आहे. टिळकनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत पूजा सांगणाऱ्या नराधमासह ३ रिक्षा चालकांना अटक केली आहे.

    सांस्कृतिक डोंबिवली शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न, 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार, चिमुकलीचाही विनयभंग(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    प्रदीप भणगे, डोंबिवली: डोंबिवली हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. मात्र आता माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अत्यंत घृणास्पद दोन घटना समोर आल्या आहेत. एका पाच वर्षांच्या चिमुरडीचा एका नराधमाने विनयंभंग केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून यामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत टिळकनगर पोलिसांनी आरोपीला तातडीने बेड्या ठोकल्या आहेत. हरीष भावे (वय 46) असे आरोपीचे नाव आहे. तर दुसरीकडे डोंबिवलीतच एका २२ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. तिघे आरोपी रिक्षा चालक असून टिळकनगर पोलिसांनी तिघांनाही बेड्या ठोकल्या आहेत.

    हरीष भावेकडून चिमूरडीचा विनयभंग

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली मधील हरीष भावे हें निंदनीय कृत्य केले असून पीडित चिमुरडीचे आई आणि वडील दोघेही कामानिमित्त घराबाहेर असतात, याचाच गैरफायदा आरोपी हरीष भावे चिमरूडीचा विनयभंग केला. पीडित चिमुरडीने तिच्यासोबत घडलेला हा सर्व प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. आपल्या पोटच्या गोळ्यासोबत घडलेला हा प्रकार ऐकून पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी कोणताही उशीर न करता आपल मुलीला सोबत घेऊन टिळकनगर पोलीस ठाणे गाठले आणि सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने गुन्हा दाखल केला आणि आरोपी हरीष भावे याला अटक केली आहे. तर सदर आरोपी हा लोकांच्या घरी जाऊन पूजा सांगतो, असे पोलिसांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले.

    Maharashtra TimesPune Crime : नाईट ड्युटीला गेलेल्या आजीची नात अज्ञाताने संपवली; लाडक्या नातीसाठी धडपडणाऱ्या आजीवर आभाळ कोसळलं, आळंदीत भयानक घटना

    तर दुसरीकडे सोलापूरची राहणारी एक महिला डोेबिवलीत सुरक्षा रक्षक एजन्सीमध्ये काम करते. तिच्या ओळखीेचे रिक्षा चालक मित्रांनी तिला पार्टीसाठी खंबाळपाडा येथील एका घरात घेऊन गेले आणि पार्टी करून एकाने तिच्यावर शिवीगाळ, मारहाण करत अत्याचार केला.तिच्या सोबत झालेल्या या घटनेची तक्रार पिडीत महिलेने टिळकगनर पोलिस ठाण्यात दिली.

    टिळकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय कदम आणि त्याच्या टीमने त्वरीत गुन्हा दाखल करुन तिघा रिक्षा चालकांना अटक केली आहे.उमेश वर्मा, चेतन चव्हाण आणि हेमंत चव्हाण अशी आरोपीची नावे असून हे तिघे जण डोंबिवलीत रिक्षा चालवितात आणि यातील मुख्य आरोपी उमेश आहे असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा