• Mon. Jun 15th, 2026
    तुम्ही गुन्ह्याचा तपास व्यवस्थित करत नाही, शिंदेंचा OSD असल्याचं पोलिसांनाच भासवलं, पुण्यात तोतया अधिकाऱ्याला अटक

    DCM Eknath Shinde Fake OSD : “तुम्ही एका गुन्ह्याचा तपास व्यवस्थित करत नाही” असा आरोप करत आरोपीने स्वतःला उपमुख्यमंत्र्यांचा जवळचा अधिकारी असल्याचे सांगितले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘ओएसडी’ (ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी) असल्याचे भासवून थेट पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तोतया व्यक्तीचा पर्दाफाश पुणे पोलिसांनी केला आहे. “तुम्ही एका गुन्ह्याचा तपास व्यवस्थित करत नाही” असा आरोप करत त्याने स्वतःला उपमुख्यमंत्र्यांचा जवळचा अधिकारी असल्याचे सांगितले. या प्रकारामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून, सरकारी नावाचा गैरवापर किती धोकादायक ठरू शकतो, याची पुन्हा एकदा जाणीव झाली आहे.

    नेमकं काय घडलं?

    प्रद्युम्न श्रीहरी पाटील (वय 47, रा. हिंजवडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पाटील याने परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्या कार्यालयात थेट प्रवेश करून अधिकाऱ्यांनाच प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. “तुम्ही एका गुन्ह्याचा तपास व्यवस्थित करत नाही” असा आरोप करत त्याने स्वतःला उपमुख्यमंत्र्यांचा जवळचा अधिकारी असल्याचे सांगितले. यावेळी त्याने आपल्या ‘ओळखी’चा धाक दाखवत तपासात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला.

    पडताळणीत बनाव उघड

    मात्र, पोलिसांच्या अनुभवामुळे त्याचा बनाव फार काळ टिकू शकला नाही. उपायुक्त रावले यांनी तातडीने त्याच्या ओळखीची पडताळणी सुरू केली. अधिकृत पातळीवर चौकशी केल्यानंतर पाटील हा कोणत्याही प्रकारे उपमुख्यमंत्र्यांशी संबंधित नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याचा सगळा बनाव उघड झाला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
    Maharashtra TimesPune Crime : पुण्यात 17 वर्षांची मुलगी पळाली, प्रेमाच्या अँगलने तपास करताना मोठा ट्विस्ट, आरोपी निघाला अंमली पदार्थ रॅकेटचा मास्टरमाईंड
    या प्रकरणी विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता सेक्शन 204 अंतर्गत त्याच्यावर कारवाई करत अटक करण्यात आली आहे. सध्या विश्रामबाग पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, आरोपीने यापूर्वी अशाच पद्धतीने कुठे फसवणूक केली आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

    लोकसभा-विधानसभा मतदारसंघात वाढ होणार, एकनाथ शिंदेंचं मतदारांना आवाहन

    Maharashtra TimesPune Crime : माझ्या सायलीची बॉडीही घरी आणता आली नाही, हातही लावू शकले नाही; बारामतीतील विवाहितेला पतीने संपवलं, आत्याचा टाहो

    पोलिसांकडून सतर्कतेचं आवाहन

    दरम्यान, सरकारी पदांचा खोटा वापर करून अधिकारी किंवा नागरिकांना धमकावण्याचे प्रकार वाढत असल्याने पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही शंका वाटल्यास त्वरित संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा