मराठवाड्यात सर्वदूर सिंचनाची सोय नाही. शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा सामना हा नेहमीच करावा लागतो. यंदा उन्हाळ्यात पाणी टंचाईने डोके वर काढले. मान्सून सुरू झाल्यानंतरही जून महिन्यात पावसाची प्रतीक्षा करावी लागली. जुलै महिन्यात देखील अनेक ठिकाणी अपेक्षित पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पिकांचे काय होणार असा प्रश्न पडला होता. एकूणच कधी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान तर कधी मालाला भाव नाही. परिणामी, बिघडलेले आर्थिक गणिते, अशा या चक्रात अन्नदाता सापडला आहे. या व इतर कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर येत आहे.
Nagpur Crime : दोन महिन्यांपूर्वी जामिनावर सुटला, बाहेर जातो सांगून पुन्हा परतलाच नाही, 20 वर्षीय तरण्याबांड पोराला संपवलं; घटनेचं गूढ वाढलंजुलै महिन्यात मराठवाड्यात १०५ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.यात सर्वाधिक म्हणजे २९ घटना एकट्या बीड जिल्ह्यात घडल्या. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. जालना जिल्ह्यात दहा, परभणी जिल्ह्यात सात, हिंगोली सहा, नांदेड जिल्ह्यात १३, लातूर मध्ये १३, तर धाराशिव जिल्ह्यातील १७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे विभागीय आयुक्तालयाच्या अहवालात नमूद आहे.
सर्वाधिक घटना बीडमध्ये
जानेवारी ते जुलै २०२६ या सात महिन्यात ५७० शेतकऱ्यांनी विविध कारणांनी आपली जीवनयात्रा संपवली असून आत्महत्या सत्र सुरूच आहे. यात सर्वाधिक म्हणजे १२४ घटना बीड जिल्ह्यात घडल्या असून त्या खालोखाल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ११९ दुर्देवी घटना घडल्या, अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.
Tukaram Mundhe FDA : छ. संभाजीनगरचं पथक बीडमध्ये पोहोचलं, तुकाराम मुंढेंची थेट आपल्याच जन्मभूमीत कारवाई; छापा मारताच धक्कादायक बाबी समोरमदतीसाठी पात्र २१५ कुटुंबे
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत २४० प्रकरणे शासनाच्या आर्थिक मदतीसाठी पात्र ठरले आहे. २९५ प्रकरणे चौकशी वा निर्णयाकरीता प्रलंबित आहेत. तर ३५ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आल्याचे विभागीय आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.
शेतकरी आत्महत्या जिल्हानिहाय माहिती
(एक जानेवारी ते जुलै २०२६ अखेर)
जिल्हा आत्महत्या
छत्रपती संभाजीनगर— ११९
जालना— ५०
परभणी— ४१
हिंगोली— ४१
नांदेड— ७४
बीड— १२४
लातूर— ३९
धाराशिव— ८२
एकूण— ४६५
शेतकरी आत्महत्या – महिनानिहाय
महिना आत्महत्या
जानेवारी २०२६— ७७
फेब्रुवारी २०२६— ५९
मार्च २०२६— ८२
एप्रिल २०२६— ७५
मे २०२६— ८१
जून २०२६— ९१
जुलै २०२६— १०५
एकूण— ५७०
