• Wed. Sep 16th, 2026
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज पाहा फक्त एका क्लिकवर


Live News in Marathi: आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी, बुधवारी नागरिकांना महागाईचा आणखी एक फटका बसला. मध्य पूर्वेतील तणावामुळे सरकारी मालकीच्या पेट्रोलियम कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात १९५.५० रुपयांची वाढ केली. तर, देशांतर्गत विमान कंपन्यांसाठी हवाई इंधनाच्या (एटीएफ) दरात ८.५६ टक्के नियंत्रित वाढ करण्यात आली. युद्धाच्या पार्श्वभूमीवर हे दर दुपटीहून अधिक होणे अपेक्षित होते. दरम्यान, पुणे शहरासह जिल्ह्याच्या काही भागांत बुधवारी दुपारी पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली. सिंहगड रस्ता, धनकवडी, कात्रज, हडपसर, लोहगाव, खराडी भागांत गारांसह पाऊस पडला. सकाळपासून उकाडा वाढला होता, दुपारनंतर वादळी वाऱ्यांसह पाऊस पडल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed